डोकीवरून ओझं वाहताना मज्जारज्जू बनला कमकुवत

By admin | Published: October 23, 2015 11:23 PM2015-10-23T23:23:10+5:302015-10-24T00:25:59+5:30

बेलेवाडीच्या नंदू साळोखेची व्यथा : जगणं असह्य बनलं, जिद्दीच्या जोरावर लेखक बनला; पण..!

The muscular weakness caused by blowing from the head | डोकीवरून ओझं वाहताना मज्जारज्जू बनला कमकुवत

डोकीवरून ओझं वाहताना मज्जारज्जू बनला कमकुवत

Next

रवींद्र येसादे-- उत्तूर -कथा, कवितांचे लेखन करणं इतकं सोपं नाही. धडधाकट पण ये-जा करीत असताना डोक्यावरील ओझ्यानं हाय खाल्ली. बेलेवाडी (ता. आजरा) गावच्या उमद्या तरुणाच्या नशिबी अपंगत्व आलं. अपंगत्व येऊ नये, अशी म्हण आहे. मात्र, आपल्याला निसर्गाने हिरावून घेतले त्याच निसर्गाने निरीक्षण करून कथा, कविता लिहिणाऱ्या नंदू सखाराम साळोखे याला पाठबळाची गरज आहे.
‘लुगडं’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्यानिमित्ताने नंदूच्या जीवनाचा सारिपाट उघडला. १ जानेवारी १९९८ चा दिवस त्याच्यासाठी काळरात्र म्हणून आला. शेताकडून डोक्यावरून ओझे घेऊन येणाऱ्या नंदूचा पाय घसरला तो कायमचा अपंगत्व घेऊनच.
पाठीचा कणा ताठ राहायचा असेल, तर मज्जारज्जू तितकाच चांगला पाहिजे. मात्र, मज्जारज्जू कमकुवत बनल्याने नंदूच कमकुवत बनला. आभाळ फाटल्यासारखं मोठं संकट नंदूच्या कुटुंबावर कोसळलं. गिरणी कामगार म्हणून काम करणारे वडील हतबल झाले. नंदू आपल्या संवेदना हरवून बसला होता. शरीर लुळे-पांगळे बनले. जगणं मुश्कील होऊन बनले. आई-वडील, भाऊ, भावजय, मित्र परिवार यांनी मोठा धीर दिला; पण मज्जारज्जू कमकुवत असल्याने नीट उभाही राहू शकत नाही.
मुंबईतही त्याच्यावर उपचार झाले. मात्र, उभा करण्याची ताकद डॉक्टर देऊ शकले नव्हते. १९९८ पासून या अपंगत्वावर मात करून आपले जीवन जगतोय. त्याच्याकडे निरीक्षण अफाट आहे. कविता करण्याची, लेखनाची आवड आहे. ग्रामीण कथाकार शि. गो. पाटील यांच्या सान्निध्यातून त्याच्या लिखाणाला बळ मिळालं आणि तो लिहू लागला. कमरेपासून शरीर साथ देत नाही. पण, लिखाण सोडले नाही.
निसर्गातील चौफेर घटनांची त्याला माहिती आहे. तो आपल्या लिखानात उतरतो. काव्य करण्याची कलाही अवगत आहे. मनमिळावू स्वभाव असल्याने नंदूचा मित्र परिवारही मोठा आहे. नंदूचा वेळ जावा यासाठी त्याला मित्रपरिवार वाचण्याचा खजिना पुरवितात. शारीरिक, नैसर्गिक क्रिया करताना नंदूला कसरत करावी लागते.
आपल्या कथेच्या प्रकाशनावेळी नंदू आपला सारिपाट मांडत असताना व्यासपीठ गहिवरून गेले होते. भाऊ सागर धायमोकलून रडत होता. तरीपण जगणे सोडले नाही. निसर्गाने मला मोडलं या निसर्गावरच मात करीत जगणं सुरू असल्याचे सांगितले.


लिखाणात खंड नाही
नंदूला ग्रामीण कथाकार शि. गो. पाटील, डॉ. संभाजी जगताप, प्रकाश केसरकर, सागर मिसाळ, संजय पोवार, भाऊ सागर साळोखे, आदी मंडळींच्या हातभार लाखमोलाचा आहे. यासर्व व्यक्ती दीपस्तंभाप्रमाणे उभ्या आहेत. त्याच्या लिखाणाची शृंखला कधी ही खंडित करू देत नाहीत, हे विशेष.

उपचारासाठी लाखोंचा खर्च
नंदू ज्यावेळी पडला त्यावेळी अनेक डॉक्टरांनी उपचार केले. घरची परिस्थिती हालाखिची बनली. मज्जारज्जू प्रत्यारोपण (स्टेमस्थेल थेरिपी) करून नंदूला नवीन जीवन देता येईल. मात्र, त्यासाठी पाच लाखांचा खर्च येतो. यातून रूग्ण ६० ते ७० टक्के बरा होतो. यासाठी सेवाभावी संस्थांनी नंदूसाठी मदत करण्याची गरज आहे.

Web Title: The muscular weakness caused by blowing from the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.