मुश्रीफांचीही चहापानास हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:49 AM2018-02-12T00:49:50+5:302018-02-12T00:49:53+5:30
कोल्हापूर : राष्टÑवादी कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी खासदार धनंजय महाडिक यांच्या रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी भेट देऊन चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. महाडिक यांनी त्यांचा पाहुणचार केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, उद्योगपती व्ही. बी. पाटील यांची उपस्थिती होती. मात्र राष्टÑवादीचा एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. उलट भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांची हजेरी नजरेत भरणारी होती.
सकाळी अकराच्या सुमारास शरद पवार यांचे आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत वाहनात खासदार महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, के. पी. पाटील होते. सोबतच्या वाहनातून ए. वाय. पाटील, व्ही. बी. पाटील हे एकत्रित आले; तर त्यापूर्वी सुनील तटकरे हे निवासस्थानी येऊन थांबले होते. यानंतर निवासस्थानी चहापान करताना पवार यांनी महाडिक कुटुंबीयांसोबत चर्चा केली. यावेळी काही काळ अनौपचारिक गप्पा झाल्या. यानंतर खासदार महाडिक यांनी पवार यांच्यासह तटकरे, मुश्रीफ, के. पी. पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच आमदार कुपेकर यांचेही स्वागत अरूंधती महाडिक यांनी केले. दरम्यान, भाजप-ताराराणी आघाडीच्या महिला नगरसेवकांनी पवार यांची एकत्रित सदिच्छा भेट घेतली. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर, नगरसेवक आशिष ढवळे, किरण नकाते, राजसिंह शेळके, विलास वास्कर, शेखर कुसाळे, गीता गुरव, अर्चना पागर, सुनंदा मोहिते, भाग्यश्री शेटके, कविता माने, सविता घोरपडे, रूपाराणी निकम, उमा इंगळे, आदी उपस्थित होते.
जिल्हा बॅँकेतील जुन्या नोटांसंदर्भात जेटलींशी चर्चा करा
शरद पवार यांनी जिल्हा बॅँकेच्या कामकाजाविषयी मुश्रीफ यांना विचारले. यावर मुश्रीफ यांनी नोटाबंदीच्या काळातील जुन्या नोटा काही प्रमाणात अद्याप बॅँकेकडे शिल्लक आहेत. त्या बदलून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन चर्चा करावी, अशी विनंती केली. यावर पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
मुश्रीफांच्या उपस्थितीने भुवया उंचावल्या
गेल्या काही दिवसांपासून खासदार महाडिक व आमदार मुश्रीफ यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या दौºयात ते एकत्र दिसणार का अशी चर्चा होती; परंतु रविवारी सकाळपासून पवार यांच्या दौºयात ते पवार यांच्या वाहनातून एकत्रच होते. विशेष म्हणजे महाडिकांच्या निवासस्थानी आयोजित चहापान कार्यक्रमालाही मुश्रीफ यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.