गोष्टी तयार करण्यात मुश्रीफ माहीर : चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 07:53 PM2020-11-02T19:53:18+5:302020-11-02T19:55:04+5:30

Politicis, Chandrkantdadapatil, hasanMusrif, kolhapurnews गोष्टी तयार करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसवाले आणि त्यातही हसन मुश्रीफ माहीर आहेत, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सायंकाळी दिले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल नियुक्त बारा जागांवरील नावे राज्यपाल फेटाळणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्या अनुषंगाने ते बोलत होते.

Mushrif Mahir in making things: Chandrakant Patil's reply | गोष्टी तयार करण्यात मुश्रीफ माहीर : चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

गोष्टी तयार करण्यात मुश्रीफ माहीर : चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देगोष्टी तयार करण्यात मुश्रीफ माहीर चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

कोल्हापूर : गोष्टी तयार करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसवाले आणि त्यातही हसन मुश्रीफ माहीर आहेत, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सायंकाळी दिले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल नियुक्त बारा जागांवरील नावे राज्यपाल फेटाळणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्या अनुषंगाने ते बोलत होते.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांनी शपथ दिल्याशिवाय आमदाराचा मुख्यमंत्री व मंत्री होत नाही. परंतु तरीही या पदावरील व्यक्तीस सातत्याने बदनाम करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू आहे. हे निंदनीय आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही त्यांच्यावर कुत्सितपणे टीका केली.

आता मुश्रीफ यांनी अशीच टीका केली आहे. त्यामुळे त्यांनी आज जी गोष्ट सांगितली आहे, त्यावर मला काही म्हणायचे नाही. कारण गोष्टी तयार करण्यात हे लोक माहीर आहेत परंतु लोक त्यांच्या असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत ते यांना हसण्यावारी नेतात, असा टोला त्यांनी लगावला.

Web Title: Mushrif Mahir in making things: Chandrakant Patil's reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.