मुश्रीफ, मंडलिक यांनी घेतले हालसिद्धनाथांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:26 AM2021-09-27T04:26:25+5:302021-09-27T04:26:25+5:30
सीमाभागातील नागरिकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र आप्पाची वाडी (ता. चिकोडी) येथील श्री हालसिद्धनाथांचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व खासदार ...
सीमाभागातील नागरिकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र आप्पाची वाडी (ता. चिकोडी) येथील श्री हालसिद्धनाथांचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांनी एकत्रित दर्शन घेतले. या दोन्हीही मान्यवरांच्या एकत्रित दर्शनाने यावेळी स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
आणूर येथील कार्यक्रमाकडे एकाच गाडीतून प्रवास करत असताना मुश्रीफ व मंडलिक आप्पाचीवाडी येथील चौकात येताच गाड्या श्री हालसिद्धनाथ देवस्थानाकडे वळल्या. हालसिद्धनाथासमोर नतमस्तक होत त्यांनी दर्शन घेतले.
स्व.मंडलिक साहेब व मुश्रीफ हे म्हाकवे,आणूर परिसरात जाताना आप्पाचीवाडीत उतरून नाथांचे दर्शन घ्यायचे.
...अन् श्रावणबाळाला दिला आधार
गाड्यांचा ताफा म्हाकवे येथील सौ. सुशीला रामचंद्र पाटील या निराधार योजनेच्या लाभार्थी महिलेने गाड्यांचा ताफा अडविला. अन् अब्रू नुकसानीच्या दाव्याच्या खर्चासाठी तिने निराधार पेन्शनमधील एक हजार रूपये मुश्रीफ यांना खारीचा वाटा देऊ केला. तुमच्यामुळे सामान्य माणसं धडधाकट असल्याचे महिला म्हणताच, मुश्रीफ व मंडलिक दोघेही भारावले.
कँप्शन
आप्पाचीवाडी ता. चिकोडी येथील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र हालसिद्धनाथाचे मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांनी एकत्रित दर्शन घेतले.