मुश्रीफ हेच आंबेओहोळचे खरे शिल्पकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:16 AM2021-06-30T04:16:30+5:302021-06-30T04:16:30+5:30

गडहिंग्लज : उत्तूर परिसरासह गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरणाऱ्या आंबेओहोळ प्रकल्पाचे खरे शिल्पकार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हेच आहेत, अशी ...

Mushrif is the true sculptor of Ambeohol | मुश्रीफ हेच आंबेओहोळचे खरे शिल्पकार

मुश्रीफ हेच आंबेओहोळचे खरे शिल्पकार

Next

गडहिंग्लज : उत्तूर परिसरासह गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरणाऱ्या आंबेओहोळ प्रकल्पाचे खरे शिल्पकार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हेच आहेत, अशी प्रतिक्रिया माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिली आहे.

दोन दशकांपूर्वी मंजुरी मिळालेल्या आंबेओहोळ प्रकल्पात यावर्षीपासून पहिल्यांदाच पाणी साठवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पूर्ततेबाबत आता श्रेयवादाला सुरुवात झाली आहे.

या पार्श्वभूमीवर दिवंगत कुपेकर यांच्या पत्नी संध्यादेवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकात म्हटले आहे, २२ वर्षांपूर्वी बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नानेच आंबेओहोळ प्रकल्पाला मंजुरी मिळाली. उत्तूर परिसरासह शिप्पूरतर्फे आजरा, जखेवाडी, कडगाव, बेकनाळ, लिंगनूर कानूल, गिजवणे व गडहिंग्लजच्या शेतीच्या पाण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.

दरम्यानच्या काळात पुनर्वसनाच्या अडचणीमुळेच प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू होते. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी मुश्रीफ यांनीच सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे तो पूर्णत्वास गेला आहे. म्हणूनच मुश्रीफ हेच आंबेओहोळचे खरे शिल्पकार आहेत.

आपल्या परिसरातील शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा संपुष्टात यावा म्हणून प्रकल्पासाठी उदार अंत:करणाने जमिनी देऊन त्याग केलेल्या शेतकऱ्यांचेही मी आभार मानते, असेही त्यांनी म्हटले आहे.

चौकट : ‘मुश्रीफ’ने कळस चढवतील !

२००९ च्या विधानसभा निडणुकीत मी आंबेओहोळचा पाया घातला आहे. परंतु, तो पूर्णत्वाला नेऊन कळस चढविण्याचे काम हाडाचे कार्यकर्ते असणारे मुश्रीफ नक्कीच करतील. त्यामुळे मनात कोणतीही शंका न बाळगता त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन कुपेकर यांनी उत्तूर येथील मेळाव्यात केले होते. याची आठवणही संध्यादेवींनी पत्रकातून करून दिली आहे.

फोटो ओळी : आर्दाळ (ता. आजरा) येथील नियोजित आंबेओहोळ प्रकल्पस्थळाच्या जागेची तत्कालीन मंत्री बाबासाहेब कुपेकर यांनी पाहणी केली होती. त्यावेळी संजय पाटील-किणीकर, वसंत धुरे, शंकर पावले, विद्याधर गुरव, संपतराव देसाई, विजय वांगणेकर आदी उपस्थित होते.

क्रमांक : २९०६२०२१-गड-०९

Web Title: Mushrif is the true sculptor of Ambeohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.