मुश्रीफ यांची राज्य शासनाकडून होणार चौकशी, किरीट सोमय्या यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 12:53 PM2023-01-16T12:53:38+5:302023-01-16T12:55:07+5:30
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची सोमय्या यांची माहिती.
"राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींना वार्षिक 50 हजार भूर्दंड बसवणाऱ्या आणि जावयाच्या कंपनीला कंत्राट देणाऱ्या माजी ग्रामविकास हसन मुश्रीफ यांची महाराष्ट्र शासनातर्फे लवकरच चौकशी होणार आहे," अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत दिली.
"पुणे येथे हॉस्टेल चालवलेली बंद पडलेली कंपनी विकत घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीवर वर्षाला 50 हजार रुपयांचा हा जावई कर लावण्यात आला. मी हे प्रकरण उघडकीस आनल्यानंतर हा शासन आदेश रद्द करण्यात आला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला दिले आहे," असे सोमय्या म्हणाले.
हसन मुश्रीफ यांच्या खात्यावर कलकत्त्याच्या बोगस कंपन्यांमधून 158 कोटी रुपये जमा झाले आहेत. रजत कंजूमर आणि माउंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांकडून त्यांच्या खात्यावर 50 कोटी जमा झाले आहेत. या कंपन्यांचा आणि मुस्लिम यांचा काय संबंध आहे हे मुश्रीफ यांनी जाहीर करावे असे माझे आव्हान असल्याचे ते म्हणाले. सोमवारी सकाळी महालक्ष्मी एक्सप्रेस ने कोल्हापुरात आलेल्या सोमय्या यांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन शासकीय विश्रामगृहावर भाजपच्या कार्यकर्त्यांची ही चर्चा केली49 कोटी 85 लाख रुपये जमा झालेले आहेत या कंपन्यांचा आणि मुस्लिम यांचा काय संबंध आहे हे एकदा जाहीर करावे असे आव्हान यावेळी सोमय्या यांनी दिले