मुश्रीफांची सवय "आ बैल मुझे मार", चंद्रकांत पाटील यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 03:49 PM2020-08-19T15:49:49+5:302020-08-19T15:52:38+5:30

महाराष्ट्रात काही घडले की मुख्यमंत्र्यांना काही म्हणायचे नसते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही काही म्हणायचे नसते मात्र लगेचच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना मात्र काहीतरी म्हणायचे असते. निष्ठा दाखवण्यासाठी केवढी केविलवाणी धडपड असून ही त्यांची धडपड आ बैल मुझे मार या वृत्तीची असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली.

Mushrif's habit "Aa bull mujhe mar", Chandrakant Patil's tola | मुश्रीफांची सवय "आ बैल मुझे मार", चंद्रकांत पाटील यांचा टोला

मुश्रीफांची सवय "आ बैल मुझे मार", चंद्रकांत पाटील यांचा टोला

Next
ठळक मुद्देमुश्रीफांची सवय "आ बैल मुझे मार", चंद्रकांत पाटील यांचा टोला निष्ठा दाखविण्याची केविलवाणी धडपड

कोल्हापूर : महाराष्ट्रात काही घडले की मुख्यमंत्र्यांना काही म्हणायचे नसते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही काही म्हणायचे नसते मात्र लगेचच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना मात्र काहीतरी म्हणायचे असते. निष्ठा दाखवण्यासाठी केवढी केविलवाणी धडपड असून ही त्यांची धडपड आ बैल मुझे मार या वृत्तीची असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली.

राज्य सरकारमधील बदल्यामध्ये अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची टीका पाटील यांनी केली होती.त्यावर मुश्रीफ यांनी सौ चुहे खाके.. अशी टीका मुश्रीफ यांनी केली.त्यास चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पाटील म्हणतात, आमचे सरकार असताना २०१४ ते २०१९ मध्ये बदल्यांमध्ये घोटाळे झाले तर त्यावेळी तुम्ही काय झोपा काढत होतात का..?

इतक्या उशिरा जाग आल्यामुळे चौकशी करायची तर करा आधी २०२० मधील बदल्यांमधील करा. तुम्ही काही केले नाही तर तुम्हाला झोंबंत कशाला.. ? आस्थापना समितीच्या शिफारशींच्या बाहेर मी सह्या करणार नाही असे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक यांनी म्हटले आहे, मी नव्हे. ग्रामपंचायतींना प्रशासक, पी एम केअर, सुशांतसिंह आत्महत्याप्रकरण अशा सगळ्या विषयांमध्ये न्यायालयाकडून थपडा खायच्या असतील तर कोण काय करणार ?

सध्या कोल्हापूरात प्रशासन हतबल आहे. कोरोना साहित्य खरेदीत भ्रष्टाचार, रुग्णांना बेड मिळत नाही आहेत, स्वबच्या अहवालामध्ये गोंधळ असा हाहाकार माजल्याच्या बातम्या रोज प्रसार माध्यमातून येत असताना त्याबाबत मुश्रीफ काहीही बोलत नाहीत पण सरकार विरोधी घडणा-या गोष्टींवरुन जनतेचे लक्ष विचलीत व्हावे म्हणून अन्य गोष्टींवर बोलायचे हे म्हणजे गिरे तो भी ..... असे म्हणण्यातला प्रकार आहे असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी म्हटले आहे..

Web Title: Mushrif's habit "Aa bull mujhe mar", Chandrakant Patil's tola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.