आंबेओहोळ पुनर्वसनासाठी आज मुश्रीफ यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:42+5:302021-07-02T04:16:42+5:30
कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे आज शुक्रवारी शासकीय विश्रामगृहावर आंबेओहोळ पुनर्वसनासाठी राहिलेल्या प्रश्नासंबंधी प्रकल्पग्रस्त व अधिकाऱ्यांसमवेत बैठक ...
कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे आज शुक्रवारी शासकीय विश्रामगृहावर आंबेओहोळ पुनर्वसनासाठी राहिलेल्या प्रश्नासंबंधी प्रकल्पग्रस्त व अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत.
आंबेओहोळ प्रकल्पात पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे, पण अद्याप पुनर्वसनाचे काही प्रश्न बाकी आहेत. त्याची सोडवणूक करण्याची ग्वाही दिली होती. त्याअनुषंगाने आज दुपारी १२ वाजता होणाऱ्या बैठकीत यावर बऱ्यापैकी तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे. न्यायालयीन प्रकरणे व स्वेच्छा पुनर्वसनावरून सध्या बराच घोळ असून, यात मार्ग निघेल अशी प्रकल्पग्रस्तांना आशा आहे. दरम्यान, ते आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता मौजे सांगाव येथ युवराज पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहे. तेथून शासकीय विश्रामगृहावर ११ वाजता बेलेवाडी मासा (ता. कागल) लघू प्रकल्प पुनर्वसनासंदर्भात बैठक होणार आहे. त्यानंतर आंबेओहोळचा आढावा होणार आहे. संध्याकाळी चार वाजता वडगाव नगरपालिकेत विकासकामांचे उद्घाटन, संध्याकाळी साडेपाच वाजता शाहू मार्केट यार्डात बांधकाम कामगारांंसाठी सुविधा केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.