पवार-राजनाथसिंह कलगीतुऱ्यावर मुश्रीफ यांचे मौन, पण चंद्रकांतदादांना दिला सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 02:44 PM2020-06-11T14:44:17+5:302020-06-11T14:45:33+5:30
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यात सुरू असलेल्या ‘महाराष्ट्रातील आघाडी सरकार’संदर्भातील कलगीतुºयाबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीप्पणीबद्दल प्रतिक्रिया देण्यास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नकार दिला, पण चंद्रकांतदादांना सल्ला दिला.
गडहिंग्लज : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यात सुरू असलेल्या ‘महाराष्ट्रातील आघाडी सरकार’संदर्भातील कलगीतुऱ्याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीप्पणीबद्दल प्रतिक्रिया देण्यास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नकार दिला, पण चंद्रकांतदादांना सल्ला दिला.
गडहिंग्लज विभागातील कोरोना परिस्थितीच्या आढाव्यासंदर्भात आयोजित बैठकीसाठी त्यांनी आज (गुरूवारी) पत्रकारांशी संवाद साधला. मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांतदादांनी वाढदिनीतरी कांही बोलायला नको होते..! भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा बुधवारी (१०) वाढदिवस झाला. मीदेखील फोनवरून त्यांना शतायुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. परंतु, त्यांनी किमान वाढदिनीतरी राजकीय भाष्य करायला नको होते.
वाढदिवस हा चांगला संकल्प करण्याचा, चांगले कांही केले असेल तर सांगण्याचा दिवस असतो. वाढदिनी त्यांनी राज्यातील आघाडी सरकारविषयी पवार व राजनाथसिंह यांच्या वक्तव्याविषयी भाष्य केले. या विषयावर मी कांहीच बोलणार नाही. परंतु, परमेश्वराने आम्हाला सत्तेची संधी दिली आहे.त्याचा पुरेपुर वापर जनतेच्या भल्यासाठी, लोक कल्याणासाठीच करू. आम्ही असे काम करून दाखवू की, जनता आमचे काम आयुष्यभर विसरणार नाही, असेही मुश्रीफ यांनी आवर्जून नमूद केले.