कस्तुरी अजूनही कॅम्प दोनवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:20 AM2021-05-30T04:20:57+5:302021-05-30T04:20:57+5:30
एव्हरेस्ट माेहिमेच्या अंतिम टप्प्यात एकामागून एक संकटांना कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकरसह अन्य गिर्यारोहकांना तोंड द्यावे लागत आहे. अरबी समुद्रात ...
एव्हरेस्ट माेहिमेच्या अंतिम टप्प्यात एकामागून एक संकटांना कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकरसह अन्य गिर्यारोहकांना तोंड द्यावे लागत आहे. अरबी समुद्रात प्रथम तोक्ते आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरात यास वादळ निर्माण झाले. त्याचा फटका एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेल्या १५० हून अधिक गिर्यारोहकांना बसला. त्यात कोल्हापूरची कस्तुरी ही सुद्धा या मोहिमेत सहभागी आहे. तिने पहिले दोन कॅम्प करून तिसऱ्या कॅम्पवर यशस्वी चढाई केली होती. चौथ्या व अंतिम कॅम्पवर चढाई करण्याच्या तयारीत असताना वादळामुळे तेथील परिस्थिती कमालीची बिघडली. त्यामुळे तिच्यासह अन्य गिर्यारोहकांना पुन्हा कॅम्प दोनवर यावे लागले. गेल्या दोन दिवसांपासून हे सर्वजण वेदर विन्डो खुली होण्यासाठी कॅम्प दोनवरच तळ ठोकून आहेत. तेथेही मोठ्या प्रमाणात हिमस्खलन सुरू झाले आहे. क्षणाक्षणाला तेथील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. सर्वजण सुखरूप असल्याचा निरोप शनिवारी सकाळी बेसकॅम्पवर आला होता. दुपारनंतर कॅम्प दोनवर येथून संर्पक होऊ शकला नाही. त्यामुळे तेथील परिस्थितीनुसार उपस्थित शेर्पा व गिर्यारोहक मोहिमेबाबत निर्णय घेणार आहेत, अशी माहिती कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांनी दिली.
टप्प्यावर ‘तोक्ते व यास’वादळामुळे अडथळा निर्माण झाला आहे. त्यात आता हिमस्खलनाचाही धोका वाढला आहे. अशा जिवावर बेतणाऱ्या परिस्थितीत वेदर विन्डो पुन्हा खुली होईल. या आशेवर कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकरसह अन्य गिर्यारोहक अजूनही कॅम्प दोनवर तळ ठोकून आहेत. मोहिमेबाबतचा निर्णय तेथील शेर्पा व गिर्यारोहक.