मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान रोजे उद्यापासून, हिलाल कमिटीचा निर्णय; रोजांचे वेळापत्रक..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 01:25 PM2023-03-23T13:25:13+5:302023-03-23T13:35:55+5:30

कोल्हापूर : चंद्र दर्शनाची साक्ष न मिळाल्याने मुस्लिम बांधवांचे रमजान रोजे उद्या, शुक्रवारपासून सुरू होत आहेत. बुधवारी झालेल्या मगरीब ...

Muslim brothers to observe holy Ramadan from tomorrow, Hilal Committee decision | मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान रोजे उद्यापासून, हिलाल कमिटीचा निर्णय; रोजांचे वेळापत्रक..जाणून घ्या

मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान रोजे उद्यापासून, हिलाल कमिटीचा निर्णय; रोजांचे वेळापत्रक..जाणून घ्या

googlenewsNext

कोल्हापूर : चंद्र दर्शनाची साक्ष न मिळाल्याने मुस्लिम बांधवांचे रमजान रोजे उद्या, शुक्रवारपासून सुरू होत आहेत. बुधवारी झालेल्या मगरीब नमाजानंतर मुस्लिम बोर्डिंगमध्ये झालेल्या हिलाल कमिटी (चांद कमिटी)च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मौलाना मन्सूर आलम कासमी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैेठकीत मुंबई, बंगलोर, लखनौ, दिल्ली, देवबंद, रत्नागिरी, रायगड ,इंडी, तसेच अन्य शहरांशी संपर्क साधण्यात आला. या ठिकाणांहून चंद्रदर्शनाची साक्ष न मिळाल्याने तरावीहची नमाज पठण आज, गुरुवारी, तर उद्या शुक्रवारपासून रोजे सुरू होत असल्याचा निर्णय उलमा कमिटीचे अध्यक्ष मौलाना मन्सूर आलम कासमी यांनी जाहीर केला.

यावेळी मौलाना इरफान कासमी, नाझिम पठाण, अब्दुल रऊफ नाईकवडे, अब्दुलसलाम कासमी, जाफर बाबा सय्यद, मुफ्ती ताहीर बागवान, वाहिद सिद्दिकी, मुफ्ती खुर्शीद कासमी, राहमतुल्ला कोकणे, हाफिज समीर, मुक्ती इस्माईल अन्सारी, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, पापाभाई बागवान, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड व कोल्हापूर शहर व उपनगरांतील सर्व मसजिदचे पेशइमाम, मुस्लिम बोर्डिंगचे सर्व पदाधिकारी संचालक व अन्य मान्यवर उपस्थित होते.

रमजान रोजांचे वेळापत्रक

रमजान रोजे काळातील सहेरी आणि इफ्तारचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे-

दिनांक - सहेरीची वेळ (पहाटे) - इफ्तारीची वेळ (सायंकाळी)

२४ मार्च - ५ वाजून १३ मिनिटे - ६ वाजून ४८ मिनिटे
२५ मार्च - ५ वाजून १२ मिनिटे - ६ वाजून ४८ मिनिटे
२६ मार्च - ५ वाजून ११ मिनिटे - ६ वाजून ४८ मिनिटे
२७ मार्च - ५ वाजून १० मिनिटे - ६ वाजून ४८ मिनिटे
२८ मार्च - ५ वाजून ९ मिनिटे - ६ वाजून ४८ मिनिटे
२९ मार्च - ५ वाजून ८ मिनिटे - ६ वाजून ४९ मिनिटे
३० मार्च - ५ वाजून ८ मिनिटे- ६ वाजून ४९ मिनिटे
३१ मार्च - ५ वाजून ७ मिनिटे- ६ वाजून ४९ मिनिटे
१ एप्रिल- ५ वाजून ६ मिनिटे - ६ वाजून ४९ मिनिटे
२ एप्रिल- ५ वाजून ५ मिनिटे - ६ वाजून ४९ मिनिटे
३ एप्रिल- ५ वाजून ४ मिनिटे - ६ वाजून ५० मिनिटे
४ एप्रिल- ५ वाजून ३ मिनिटे - ६ वाजून ५० मिनिटे
५ एप्रिल- ५ वाजून २ मिनिटे - ६ वाजून ५० मिनिटे
६ एप्रिल- ५ वाजून २ मिनिटे - ६ वाजून ५० मिविटे
७ एप्रिल- ५ वाजून १ मिनिट - ६ वाजून ५० मिनिटे
८ एप्रिल- ५ वाजता - ६ वाजून ५० मिनिटे
९ एप्रिल- ४ वाजून ५९ मिनिटे - ६ वाजून ५१ मिनिटे
१० एप्रिल- ४ वाजून ५८ मिनिटे - ६ वाजून ५१ मिनिटे
११ एप्रिल- ४ वाजून ५७ मिनिटे - ६ वाजून ५१ मिनिटे
१२ एप्रिल- ४ वाजून ५७ मिनिटे - ६ वाजून ५१ मिनिटे
१३ एप्रिल- ४ वाजून ५६ मिनिटे - ६ वाजून ५१ मिनिटे
१४ एप्रिल - ४ वाजून ५५ मिनिटे - ६ वाजून ५१ मिनिटे
१५ एप्रिल- ४ वाजून ५४ मिनिटे - ६ वाजून ५२ मिनिटे
१६ एप्रिल- ४ वाजून ५३ मिनिटे - ६ वाजून ५३ मिनिटे
१७ एप्रिल- ४ वाजून ५२ मिनिटे - ६ वाजून ५२ मिनिटे
१८ एप्रिल- ४ वाजून ५२ मिनिटे - ६ वाजून ५२ मिनिटे
१९ एप्रिल- ४ वाजून ५१ मिनिटे - ६ वाजून ५३ मिनिटे
२० एप्रिल- ४ वाजून ५० मिनिटे - ६ वाजून ५३ मिनिटे
२१ एप्रिल - ४ वाजून ४९ मिनिटे - ६ वाजून ५३ मिनिटे
२२ एप्रिल - ४ वाजून ४९ मिनिटे - ६ वाजून ५३ मिनिटे

Web Title: Muslim brothers to observe holy Ramadan from tomorrow, Hilal Committee decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.