पूजा महाडिक यांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:36 PM2017-09-16T13:36:33+5:302017-09-16T13:42:21+5:30
पूजा महाडिक यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षिय, संघटनाच्यावतीने शनिवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून मूक मोर्चा काढण्यात आला. बिंदू चौक येथून सकाळी अकरा वाजता या मोर्चास प्रारंभ होऊण लक्ष्मीपुरी येथे या मोर्चांची सांगता झाली.
कोल्हापूर : पूजा महाडिक यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षिय, संघटनाच्यावतीने शनिवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून मूक मोर्चा काढण्यात आला. बिंदू चौक येथून सकाळी अकरा वाजता या मोर्चास प्रारंभ होऊण लक्ष्मीपुरी येथे या मोर्चांची सांगता झाली.
मागणीचे निवेदन शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना देण्यात आले. महाडिक यांच्या खुन्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी यावेळी महिला - मुलींनी पोलिस प्रशासनाकडे केली.
शास्त्रीनगर येथे फ्लॅटमध्ये राहणार्या पूजा रूपेश महाडिक यांची हत्या करणारा संशयित आरोपी अल्पवयीन असल्याने कायद्याच्या पळवाटा शोधून तो सुटेल. या करिता कायद्यात बदल करावा व महाडिक कुटुंबीयांना न्याय मिळावा. यासाठी सर्वपक्षीय संघटनांच्यावतीने बैठक घेऊन मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी हा मोर्चा काढण्यात आला. बिंदू चौक येथून शनिवारी या मोर्चाला प्रारंभ झाला.
मोर्चामध्ये महिला व कॉलेज युतीची संख्या लक्षणिय होती. या मुली व महिलांनी हातामध्ये मला न्याय द्या, जलदगती न्यायालयात सदरची केस चालवावी असे फलक हातामध्ये घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या. शिवाजी रोड, महाराणा प्रताप चौकमार्गे लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे येथे मोर्चाचा समारोप झाला. या ठिकाणी आपल्या मागण्याचे निवेदन अंजली कवाळे या युवतीच्या मार्फत पोलिस प्रशासनास देण्यात आले.
मोर्चामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आर.के.पोवार, जयकुमार शिंदे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतरावमुळीक, माजी नगरसेवक सुनिल मोदी,जितू सलगर, मनसे परिवहनचे विजय करजगार, गोपाळ गोखले, मनसेचे श्रध्दा मजगावकर, स्वाभिमानी संघटनेचे सचिन तोडकर, रहीम सनदी, दिपक पोलादे, स्वप्निल पार्टे, अवधूत पाटील, नेहा मुळीक, वंदना आळतेकर, गीता हासूरकर, स्मिता काळे, अर्चंना भोसले यांच्यासह महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्यने सहभागी झाल्या होते.
ही विकृत मानसिकतेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. परत अशा घटना समाजामध्ये होऊ नयेत यासाठी
सदर आरोपीला कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
- ऋतुजा राणे
हे अमानवी कृत्य या मुलांने केले आहे, जर कायदामुळे हा असाच सुटला तर यासारखे अन्य घटना घडू शकतात.
त्यामुळे यांचावर कडक शिक्षा होणे गरजेचे आहे.
- सीमा उरुणकर