संभाजीराजेंवरील पक्षीय आक्षेपांना फडणवीसांचे परस्पर उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 10:48 AM2021-02-13T10:48:10+5:302021-02-13T10:58:31+5:30

Devendra Fadnavis Sambhaji Raje Chhatrapati kolhapur- संभाजीराजे यांना भाजपने खासदारकी दिली. मात्र, त्यांचा पक्षाला काय उपयोग, असा थेट सवाल उपस्थित करणाऱ्या नेते, कार्यकर्त्यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी न्यू पॅलेसवर हजेरी लावून परस्पर उत्तर दिल्याचे मानले जाते. त्यामुळे या दोघांचे संबंध असेच सलोख्याचे राहिले तर संभाजीराजेंना खासदारकीची दुसरी टर्म अवघड नसल्याचेही मानले जाते.

Mutual response of Fadnavis to partisan objections against Sambhaji Raje | संभाजीराजेंवरील पक्षीय आक्षेपांना फडणवीसांचे परस्पर उत्तर

संभाजीराजेंवरील पक्षीय आक्षेपांना फडणवीसांचे परस्पर उत्तर

Next
ठळक मुद्देसंभाजीराजेंवरील पक्षीय आक्षेपांना फडणवीसांचे परस्पर उत्तर न्यू पॅलेसवरील उपस्थितीने भाजपमधीलच अनेकांच्या उंचावल्या भुवया

समीर देशपांडे


कोल्हापूर : संभाजीराजे यांना भाजपने खासदारकी दिली. मात्र, त्यांचा पक्षाला काय उपयोग, असा थेट सवाल उपस्थित करणाऱ्या नेते, कार्यकर्त्यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी न्यू पॅलेसवर हजेरी लावून परस्पर उत्तर दिल्याचे मानले जाते. त्यामुळे या दोघांचे संबंध असेच सलोख्याचे राहिले तर संभाजीराजेंना खासदारकीची दुसरी टर्म अवघड नसल्याचेही मानले जाते.

फडणवीस यांनी अतिशय व्यस्त वेळातून गुरूवारी कोल्हापूरमध्ये येत संभाजीराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केवळ एका तासासाठी ते संभाजीराजे यांच्यासाठी कोल्हापुरात आले होते. यातूनच त्यांनी संभाजीराजे यांच्याविषयीच्या आपल्या भावना स्पष्ट केल्या आहेत.

सुरूवातीला किल्ले संवर्धन, नंतर राज्याभिषेकारोहण आणि गेल्या काही वर्षात मराठा आरक्षणासाठी जनजागरण या त्रिसुत्रीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरणारे संभाजीराजे यांना दहा वर्षांपूर्वी लोकसभेला राष्ट्रवादीची उमेदवारी असतानाही कोल्हापुरात पराभव स्वीकारावा लागला होता. संसदेच्या माध्यमातून मोठं काम उभं करण्याची संभाजीराजे यांची महत्त्वाकांक्षा भाजपने वास्तवात आणली आणि संभाजीराजे राष्ट्रपती नियुक्त खासदार झाले. यासाठी फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

जरी संभाजीराजे हे भाजपकडून खासदार असले तरीही त्यांनी भाजपच्या पक्षीय राजकारणामध्ये फारसा रस घेतलेला नाही. याउलट ते भाजपपासून सुरक्षित अंतर ठेवून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत समन्वयाच्या भूमिकेत दिसत आहेत. हाच मुद्दा भाजपच्या मुंबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत काही नेते, कार्यकर्त्यांनी उपस्थित केला होता. मात्र, आता येथे या विषयावर चर्चा नको, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले होते.

अन् फडणवीस यांचा दौरा ठरला

संभाजीराजे यांच्या वाढदिवसासाठी येण्याचा फडणवीस यांचा निर्णय अगदी ऐनवेळी झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बुधवारी जेव्हा स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना हा निरोप मिळाला तेव्हा अनेकांना फडणवीस केवळ संभाजीराजेंना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत, याचे आश्चर्य वाटले. मात्र, संभाजीराजे पक्षीय कामात नसतात, असा आक्षेप घेणाऱ्यांना फडणवीस यांनी परस्पर उत्तर दिले.

Web Title: Mutual response of Fadnavis to partisan objections against Sambhaji Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.