माझी प्रकृती एकदम ठणठणीत : मंडलिक

By admin | Published: October 26, 2014 12:03 AM2014-10-26T00:03:09+5:302014-10-26T00:05:51+5:30

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘माझी प्रकृती अत्यवस्थ आहे’

My condition is very cool: Mandalik | माझी प्रकृती एकदम ठणठणीत : मंडलिक

माझी प्रकृती एकदम ठणठणीत : मंडलिक

Next

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘माझी प्रकृती अत्यवस्थ आहे’ इथपासून ते ‘मी संपलो’ या पद्धतीच्या निराधार, खोडसाळ बातम्या व अफवा पसरवून विरोधकांनी स्वाभिमानी जनतेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. आजही या अफवा जोर धरत आहेत; परंतु माझी प्रकृती ठणठणीत असून, मी सध्या वैद्यकीय सल्ल्यानुसार विश्रांती घेत आहे. ज्यांनी माझ्याबाबत अफवा पसरविल्या, त्यांना परमेश्वर माफ करो, अशा शब्दांत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी आपल्या भावना पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.
ते म्हणाले, गेल्या पन्नास-साठ वर्षांच्या माझ्या सार्वजनिक आयुष्यात माझ्यावर प्रेम करणारी कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरीब जनता आणि स्वाभिमानी कार्यकर्ते ही माझी अभेद्य कवचकुंडले आहेत. त्यांच्या बळावरच आजवर अनेक लढाया लढलो आहे, अनेक संघर्षमय प्रसंगांत यशस्वी झालो आहे. निवडणुकीतील यश-अपयश खंबीरपणे पचवून मी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि अस्मितेसाठी लढत राहिलो. त्यामुळे आजपर्यंत माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आमदार, खासदार व मंत्री होऊ शकला, याची मला जाणीव आहे. सार्वजनिक जीवनात काम करीत असताना अशा प्रकारच्या खोडसाळपणाला व अफवांना मी व माझ्या कार्यकर्त्यांनी कधीही भीक घातलेली नाही.
तरीही दिवाळीच्या सणाच्या काळात अशा पद्धतीची दुर्बुद्धी सुचलेल्या विघ्नसंतुष्ट लोकांना परमेश्वराने माफ करावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Web Title: My condition is very cool: Mandalik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.