निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 06:28 PM2020-09-16T18:28:42+5:302020-09-16T18:33:03+5:30
निवडे (ता.गगनबावडा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गगनबावडा पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित 'माझे कुटूंब,माझी जबाबदारी ' मोहिमेच्या शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील व सभापती संगिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
साळवण - जनतेच्या सहभागातून कोवीड मूक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासनाने राबविलेली 'माझे कुटूंब माझी जबाबदारी ' ही मोहिम गगनबावडा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये राबविणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूरजिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले. ते निवडे (ता.गगनबावडा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गगनबावडा पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित 'माझे कुटूंब,माझी जबाबदारी ' मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.
माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील व सभापती संगिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमे अंतर्गत १५ सप्टेंबर ते २४ ऑक्टोंबर या कालावधीत मोबाईल अॅपद्वारे आरोग्य पथकामार्फत प्रत्येक नागरिकाची माहीती घेतली जाणार असून ही मोहिम दोन टप्यात राबविली जाणारे आहे.
गगनबावडा तालुक्याच्या ३८८७७ लोकसंख्येसाठी ७७७५ कुटुंबे असून यासाठी एकूण ३० पथके तयार केली आहेत, या पथकामध्ये आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका व सरपंच कार्यरत राहणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी अजयकुमार गवळी यांनी दिली.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, गगनबावडा पंचायत समिती सभापती संगिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी अजयकुमार गवळी, सामाजिक कार्यकर्ते दादू पाटील, माजी सरपंच सहदेव कांबळे, आरोग्य विस्तार अधिकारी विजय सावंत, अर्जुन इंगळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक अरुण मेथे, आनंद काळे, परचारिका आय.व्ही. पुजारी आदीसह आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.