चंदगड डोंगराळ भागासाठी ‘माय लॅब्स’ रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:52+5:302021-06-16T04:32:52+5:30
हलकर्णी ‘एमआयडीसी’मध्ये ४ एकर जागेत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी अंदाजित ३० कोटी रुपयांच्या केलेल्या मागणीस हिरवा कंदील आरोग्यमंत्री टोपे व ...
हलकर्णी ‘एमआयडीसी’मध्ये ४ एकर जागेत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी अंदाजित ३० कोटी रुपयांच्या केलेल्या मागणीस हिरवा कंदील आरोग्यमंत्री टोपे व पवारांनी दाखविला. गडहिंग्लज येथे १०० बेडच्या रुग्णालयात १० बेडचे सुसज्ज आणि अद्ययावत आयसीयू युनीट तत्काळ देण्याचे अभिवचन टोपे यांनी राजेश पाटील यांना दिले.
या वेळी कामगारमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार प्रकाश आवडे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई आदी उपस्थित होते.
-------------------------
* फोटो ओळी : कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, यांनी चंदगडच्या आरोग्यसेवा व समस्यांबाबत विचारपूस केली. या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील-यड्रावकार आदी उपस्थित होते.
क्रमांक : १५०६२०२१-गड-०५