‘वारणे’विषयी माझी भूमिका समन्वयाची: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:38 PM2019-04-16T23:38:26+5:302019-04-16T23:38:34+5:30

इचलकरंजी : वारणा नळ योजनेसाठी विरोध करणारे शिवसेनेचे आहेत. या योजनेविषयी माझी भूमिका समन्वयाची असूनही पिण्याच्या पाण्यासाठी मला अनाठायी ...

My role about 'Waray' was coordinated: Raju Shetty | ‘वारणे’विषयी माझी भूमिका समन्वयाची: राजू शेट्टी

‘वारणे’विषयी माझी भूमिका समन्वयाची: राजू शेट्टी

Next

इचलकरंजी : वारणा नळ योजनेसाठी विरोध करणारे शिवसेनेचे आहेत. या योजनेविषयी माझी भूमिका समन्वयाची असूनही पिण्याच्या पाण्यासाठी मला अनाठायी दोष का दिला जात आहे? तसेच इचलकरंजी परिसरातील वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी ‘टफ्स्’चे ३५० कोटी रुपयांचे अनुदान मिळवून दिले आहे. यंत्रमाग केंद्रातील भाजपच्या सहा खासदारांनी काय केले, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी उपस्थित केला.
सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये वारणा नळ योजनेला विरोध केला म्हणून भाजपकडून खासदार शेट्टींना ‘टार्गेट’ केले जात आहे, तर शेट्टींनी वस्त्रोद्योगासाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित केला आहे. अशा पार्श्वभूमीवर खासदार शेट्टी यांनी मंगळवारी इचलकरंजी शहर व परिसरातील काही प्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यावेळी भाजपच्या या फसव्या प्रचाराबाबत ते बोलत होते.
ते म्हणाले, वारणा नळ योजना कॉँग्रेस सरकारच्या काळात मंजूर झाली. कुंभोज (ता. हातकणंगले) येथे वारणा नदीकाठावर जॅकवेलची जागाही निश्चित झाली होती; पण पंचगंगा-कृष्णाबरोबर वारणा नदी प्रदूषित होणार म्हणून आपण कोल्हापूरप्रमाणे काळम्मावाडी धरणाचे पाणी आणू, असे सांगून आमदार सुरेश हाळवणकर यांनी काळम्मावाडीचा पुरस्कार केला. त्याचा एक कोटी ८० लाख रुपयांचा डीपीआर नगरपालिकेने करून घेतला; पण पुढे त्याचा पाठपुरावा केला नाही.
दोन-अडीच वर्षांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर झालेल्या बैठकीत ७४५ कोटी रुपये खर्चाची काळम्मावाडी योजना शासनाने राबविली, तरी या योजनेचे वीज बिल व व्यवस्थापन खर्च नगरपालिकेला सोसणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आमदार हाळवणकर व नगरपालिकेने दानोळी (ता. शिरोळ) येथून वारणा योजना करण्याचे निश्चित केले. मात्र, २०१५-१६ मध्ये पाऊस कमी झाला. वारणाकाठावर शेती सिंचनासाठी दोन-अडीच महिने बंदी आली. दुष्काळी झळा जाणवू लागल्याने दानोळीसह नदीकाठावरील अन्य गावांनीही वारणा नळ योजनेला विरोध केला. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारणा योजनेचे आॅनलाईन उद्घाटनही केले होते. अशा घडामोडींमध्ये आमदार हाळवणकर यांना खासदार शेट्टींची आठवण झाली नाही; पण दानोळी येथून विरोध चालू होताच त्याचे खापर मात्र माझ्यावर फोडले गेले.
पण, वारणा योजनेस विरोध करणारे महादेवराव धनवडे आणि आमदार उल्हास पाटील हे शिवसेनेचे होते. भाजपचे सहयोगी सदस्य असूनसुद्धा त्यांचा विरोध कमी करण्यात आमदार हाळवणकरांनी काय केले? त्यांना आलेल्या अपयशासाठी मलाच दोषी ठरविले जात आहे. असे असले तरी आपण वारणा नदीकाठावरील शेतकरी व इचलकरंजीची जनता यांच्यात समन्वय साधून वारणा नळ योजना पूर्ण करू, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.
वस्त्रोद्योगाबाबत शेट्टी म्हणाले, भिवंडी, मालेगाव, सोलापूर, बृहाणपूर, सुरत, भिलवाडा अशा सहा ठिकाणचे खासदार भाजपचेच आहेत. त्या खासदारांनी वस्त्रोद्योगासाठी काही केले नाही. उलट ‘टफ्स्’अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची ३५० कोटींची रक्कम इचलकरंजी परिसरातील उद्योजकांना मिळवून दिली. वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी असलेले ३० टक्के अनुदान भाजप सरकारने दहा टक्क्यांवर आणले. वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांच्याकडे उद्योजकांचे गाºहाणे मांडावयास गेले तरी त्यांना वस्त्रोद्योगातील काही समजत नाही आणि समजावून घेऊन काही करायची त्यांची इच्छा नाही.
सुलभ रोजगार देणाºया या उद्योगाकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी दिलेल्या कर्जावरील व्याजदर अनुदानाचे आश्वासन पूर्ण केले नाही. यंत्रमाग क्षेत्रासाठी एक रुपया वीज अनुदान दिले, तर दुसºया घटकाचे विजेचे दर वाढवून त्यातून आलेली रक्कम अनुदान म्हणून पहिल्या घटकाला दिली. असे विचित्र धोरण सरकारचे आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले. यासह आणखीन काही प्रश्नांवर खासदार शेट्टी यांनी भूमिका मांडली.
आपणच शहाणे असल्याचा भाजप मंत्र्यांचा आविर्भाव
पूर्वीच्या कॉँग्रेस सरकारच्या काळात मंत्र्यांकडून लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या जात होत्या. काही मुद्दे ऐकून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात असे; पण सध्याच्या भाजप सरकारमधील मंत्री आपणच शहाणे आहोत, असा आविर्भाव आणतात. यांना कितीही सांगितले तरी ते काहीच करीत नाहीत आणि काही केले तर त्यातून अधिक क्लिष्टता निर्माण केली जाते, अशीही टीका खासदार शेट्टी यांनी केली.

Web Title: My role about 'Waray' was coordinated: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.