माझी त्र्यंबोली यात्रा माझी जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:26 AM2021-07-14T04:26:23+5:302021-07-14T04:26:23+5:30
कोल्हापूर : त्र्यंबोली देवीची आषाढ महिन्यातील यात्रा आज मंगळवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरव पुजारी मंडळींनी ‘माझी त्र्यंबोली ...
कोल्हापूर : त्र्यंबोली देवीची आषाढ महिन्यातील यात्रा आज मंगळवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरव पुजारी मंडळींनी ‘माझी त्र्यंबोली यात्रा माझी जबाबदारी’ या माध्यमातून भाविकांना मंदिर परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. यात्रेनिमित्त मंदिराचे वॉटर प्रूफिंग, रंगरंगोटी व स्वच्छता करण्यात आली आहे.
आषाढ महिन्यातील दर मंगळवारी व शुक्रवारी त्र्यंबोली देवीची यात्रा असते. या वेळी पेठांमधून तालीम, मंडळांच्या माध्यमातून त्र्यंबोली देवीला पाणी वाहण्याचा धार्मिक विधी केला जातो. एरवी आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनंतर या यात्रा धडाक्यात साजरा होतात, मात्र सध्या कोरोना दुसऱ्या लाटेचा संसर्ग असल्याने पहिल्या मंगळवारपासूनच यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या यात्रांना मनाई आहे, शिवाय मंदिरेदेखील बंद आहेत. त्यामुळे पुजारी प्रदीप, संतोष व सूर्यकांत गुरव यांनी माझी त्र्यंबोली यात्रा माझी जबाबदारी ही मोहीम सुरू आहे. याद्वारे भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करू नये, देवीचे सर्व धार्मिक विधी नित्यनेमाने पार पडतील, ज्यांना अभिषेक व नैवेद्य अर्पण करायचे आहे, त्यांनी कोरडी शिधासामग्री देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
--
फोटो नं १२०७२०२१-कोल-त्र्यंबोली मंदिर
ओळ : मंगळवारपासून सुरू होणाऱ्या आषाढ यात्रेनिमित्त कोल्हापुरातील त्र्यंबोली देवीच्या मंदिराची रंगरंगोटी, स्वच्छता व वॉटर प्रूफिंग करण्यात आले आहे.
---