‘माझा टीव्ही, माझी शाळा’ उपक्रम उद्यापासून नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:25 AM2021-08-15T04:25:28+5:302021-08-15T04:25:28+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या ...

‘My TV, My School’ activities are regular from tomorrow | ‘माझा टीव्ही, माझी शाळा’ उपक्रम उद्यापासून नियमित

‘माझा टीव्ही, माझी शाळा’ उपक्रम उद्यापासून नियमित

Next

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासक तथा करवीर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी शंकर यादव यांच्या संकल्पनेतून ‘माझा टीव्ही, माझी शाळा’ ही शैक्षणिक मालिका उद्या, सोमवारपासून स्थानिक दूरदर्शन चॅनेलवरून नियमितपणे सुरू होत आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यादव यांनी केले.

रोज सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत इयत्ता पहिली ते सातवीचे मराठी व उर्दू माध्यमाच्या सर्व विषयांच्या इयत्तानिहाय ‘तासिका’ बी न्यूजच्या चॅनल क्र. ३३२ एसडी आणि ८२२ एचडी एस न्यूजच्या चॅनल क्र. ४६९, तर KOP माझा युट्यूब चॅनलवर दुपारी ३ नंतर पाहता येईल. इयत्ता ५वी ते ८वी शिष्यवृत्तीच्या पार्श्वभूमीवर मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता या विषयांचे विशेष मार्गदर्शन तासिका मालिकेद्वारे प्रसारित केले जाणार आहे.

शिक्षकांकडून स्वखर्चाने व्हिडिओ निर्मिती

उपक्रमांसाठी व्हिडिओ निर्मितीसाठी मोबाईल कॅमेरा, माईक, लाईट, आदी आवश्यक बाबींसाठी शिक्षकांनी पदरमोड करून उत्कृष्ट व्हिडिओ निर्मिती केली आहे. त्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिक्षकांचे कौतुक केले.

Web Title: ‘My TV, My School’ activities are regular from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.