महापालिकेच्यावतीने माझी वसुंधरा अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:20 AM2021-01-02T04:20:56+5:302021-01-02T04:20:56+5:30
कोल्हापूर : निसर्गाशी असलेली कटिबध्दता निश्चित करण्यासाठी, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नि आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना ...
कोल्हापूर : निसर्गाशी असलेली कटिबध्दता निश्चित करण्यासाठी, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नि आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे.
वसुंधरेच्या प्रती आपली जबाबदारी म्हणून राज्यातील प्रत्येक नागरिकाने आपला सहभाग म्हणून दि.१ ते १५ जानेवारी या कालावधित माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने हरित शपथ घ्यावयाची आहे. राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना अशी शपथ घेण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून महापालिकेअंतर्गत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना शपथ घेतली.
‘मी माझे घर व आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवीन. निसर्गाच्या पंचतत्त्वांचे संरक्षण व संवर्धन करेन. पर्यावरणपूरक व निसर्गपूरक जीवनपध्दतीचा अवलंब करेन. माझी वसुंधरा अभियानामध्ये सहभाग नोंदवेन व पर्यावरण सप्तपदीचे पालन करेन. स्वच्छ, सुंदर, हरित व पर्यावरणपूरक राखण्यासाठी सदैव कटिबध्द राहीन’, अशी शपथ घेण्यात आली.
यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त चेतन कोंडे, संदीप घार्गे, मुख्य लेखापरीक्षक वर्षा परीट, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबंरे, उपअग्निशम अधिकारी तानाजी कवाळे, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, सिस्टिम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, नगरसचिव सुनील बिद्रे यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो क्रमांक - ०१०१२०२१-कोल-केएमसी - शपथ
ओळ -
कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शुुक्रवारी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांनी हरितशपथ घेतली.