माझे गाव, कोरोनामुक्त गाव मोहीम राबवा : मुरलीधर जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:10+5:302021-07-15T04:18:10+5:30
जयसिंगपूर : माझे गाव कोरोनामुक्त गाव ही मोहीम शिवसेनेच्या माध्यमातून राबवावी. सन २०२२ निवडणुकीचे लक्ष ठेवून प्रत्येक घरात शिवसैनिक ...
जयसिंगपूर : माझे गाव कोरोनामुक्त गाव ही मोहीम शिवसेनेच्या माध्यमातून राबवावी. सन २०२२ निवडणुकीचे लक्ष ठेवून प्रत्येक घरात शिवसैनिक निर्माण करा. सर्वसामान्य समाजाच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करा. शिरोळ तालुक्यात शिवसेनेचा हक्काचा आमदार निवडण्यासाठी सज्ज राहा. येत्या आठ दिवसांत पदाधिकाऱ्यांच्या निवडी पूर्ण करा, असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केले.
जयसिंगपूर येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पाटील तर संपर्कप्रमुख राजाराम सुतार, आण्णासाहेब बिलोरे प्रमुख उपस्थित होते. स्वागत तेजस कुराडे देशमुख यांनी केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची गोकूळच्या शासन नियुक्त संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर संजय वैद्य यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. शिवसेना पक्ष प्रवेश झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक पराग पाटील, तालुकाप्रमुख वैभव उगळे, जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास रेखा जाधव, अर्चना भोजणे, संजय काळे, आकाश शिंगाडे, अनिल पवार, शिवाजी पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. धनाजी पवार यांनी आभार मानले.
फोटो - १४०७२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचा शिवसैनिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.