‘माझं गाव माझा सुंदर घाट’ योजना राबविणार : स्वाती सासणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:26 AM2021-04-01T04:26:01+5:302021-04-01T04:26:01+5:30

उदगावमध्ये छत्रपती शाहू महाराज यांचे हंगामी निवासस्थान अस्तित्वात आहे. याच काळातील करवीर संस्थान काळात उदगाव येथे स्थापन केलेला जकात ...

'My village, my beautiful ghat' scheme will be implemented: Swati Sasane | ‘माझं गाव माझा सुंदर घाट’ योजना राबविणार : स्वाती सासणे

‘माझं गाव माझा सुंदर घाट’ योजना राबविणार : स्वाती सासणे

googlenewsNext

उदगावमध्ये छत्रपती शाहू महाराज यांचे हंगामी निवासस्थान अस्तित्वात आहे. याच काळातील करवीर संस्थान काळात उदगाव येथे स्थापन केलेला जकात नाका, धान्याचे कोठार, बंगला, घोड्याची पागा, सदर, रामलिंग घाट, हत्ती घाट यांसह विविध वास्तू आजही आहेत. परंतु घाटाची अवस्था वाईट झाली असून त्याचे सुशोभिकरण करावे, यासाठी बुधवारी सकाळी कृष्णा नदीकाठावर समाजकल्याण सभापती सासणे यांच्यासह पथकाने पाहणी केली.

सभापती सासणे म्हणाल्या, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे घाट सुशोभिकरण करण्यासाठी निधीची मागणी केली आहे. जिल्हा नियोजनमधूनही थोडी तरतूद व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पाटबंधारे शाखाधिकारी आर. सी. दानोळे, सरपंच कलिमुन नदाफ, अरुण कोळी, सलीम पेंढारी, सावित्री मगदूम, दीपिका कोळी, राजू कलगुटगी उपस्थित होते.

फोटो - ३१०३२०२१-जेएवाय-०७

फोटो ओळ -

उदगाव (ता. शिरोळ) येथे शाहुकालीन घाटाची पाहणी करण्यात आली. यावेळी सभापती स्वाती सासणे, आर. सी. दानोळे, कलिमुन नदाफ, अरुण कोळी उपस्थित होते.

Web Title: 'My village, my beautiful ghat' scheme will be implemented: Swati Sasane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.