नाबार्ड देणार पाणी बचतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:32 AM2018-08-28T00:32:17+5:302018-08-28T00:32:21+5:30

NABARD will provide water saving message | नाबार्ड देणार पाणी बचतीचा संदेश

नाबार्ड देणार पाणी बचतीचा संदेश

Next

कोल्हापूर : जिल्ह्यात पाणी मुबलक असले तरी काळाची पावले ओळखून शेतकऱ्यांनी पाणी बचतीकडे वळले पाहिजे. उत्पादकता वाढीसाठी ठिबक ही काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा बॅँकेच्या ज्येष्ठ संचालिका, माजी खासदार निवेदिता माने यांनी केले.
‘नाबार्ड’च्यावतीने पाण्याचा कार्यक्षम वापर अभियानाचा प्रारंभ सोमवारी जिल्हा बॅँकेत करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. माने म्हणाल्या, जिल्हा बॅँकेने शेतकºयांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या आहेत. ‘नाबार्ड’ने योजनांचा केवळ प्रसार न करता शेतकºयांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘नाबार्ड’चे सहायक महाप्रबंधक नंदू नाईक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात ९४ टक्के शेतकरी पाच एकरांच्या आतील आहेत. त्यामुळे उत्पादकता वाढली तरच शेती किफायतशीर होऊ शकते. उत्पादकता वाढीसाठी ठिबकची गरज असून, ‘नाबार्ड’ने त्यासाठी जनजागृती अभियान सुरू केले आहे. पाच तालुक्यांतील शंभर गावांमध्ये जाऊन जैन इरिगेशन व दृष्टी ग्राम कृषी विकास संस्थेचे पदाधिकारी शेतकºयांमध्ये प्रबोधन करतील.
यावेळी जैन इरिगेशनचे उद्धव पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, आसिफ फरास, उदयानी साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. पाण्याचा कार्यक्षम वापर अभियान व्हॅनचा प्रारंभ निवेदिता माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कृषी उपसंचालक भाग्यश्री पवार, बॅँकेचे संचालक अनिल पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राजीव आवळे, सर्जेराव पाटील-पेरीडकर, आर. के. पोवार, विलास गाताडे, विविध गावांतील सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. व्यवस्थापक जी. एस. शिंदे यांनी आभार मानले.
ठिबक कर्जावरील व्याज आवाक्याबाहेर
जिल्ह्यातील पहिले शंभर टक्के ठिबक राबविणारे कारभारवाडी (ता. करवीर) येथील शेतकरी साळोखे म्हणाले, ठिबकमुळे एकरी ४०-५० टन उसाचे उत्पादन मिळते; पण ठिबकसाठी काढलेल्या कर्जाचा व्याजदर परवडत नाही. त्यासाठी ‘नाबार्ड’ने मदत केल्यास ठिबकचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल.
रुकडीचा खडकाळ माळ फुलला!
रयत शिक्षण संस्थेने जैन इरिगेशनच्या मदतीने रुकडी येथील खडकाळ माळ फुलविला आहे. शंभर एकरांत ऊस, सोयाबीनसह फळांच्या बागा डोलू लागल्या असून, ठिबकची शेती किफायतशीर कशी, याचे उत्तम उदाहरण आहे. लवकरच याचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.

Web Title: NABARD will provide water saving message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.