न्यू कॉलेजमध्ये २३, २४ मार्चला नॅक मूल्यांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:22 AM2021-03-21T04:22:28+5:302021-03-21T04:22:28+5:30
कोल्हापूर : येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेजचे २३ आणि २४ मार्चला नॅकचे मूल्यांकन करण्यात ...
कोल्हापूर : येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेजचे २३ आणि २४ मार्चला नॅकचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पाटील म्हणाले, नॅक बेंगलोरची पीअर टीम या मूल्यांकनासाठी येणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये शिवाजी विद्यापीठातील २९३ महाविद्यालयांमध्ये क्रीडा क्षेत्रातील मानाची समजली जाणारी मेघनाथ नागेशकर जनरल ट्रॉफी सलग महाविद्यालयाने मिळवली आहे. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तीनवेळा प्रथम क्रमांक, एकदा दुसरा क्रमांक प्राप्त, पाच माजी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार अशा विविध वैशिष्ट्यांच्याआधारे महाविद्यालय या मूल्यांकनासाठी सामाेरे जात आहे.
पत्रकार परिषदेला उपप्राचार्य डॉ. एम. एम. शेख, नॅक समन्वयक डॉ. नीलेश पवार, उपप्राचार्य टी. के. सरगर, प्रा. डॉ. सर्जेराव पाटील, प्रा. जे. बी. दिंडे, प्रबंधक एच. के. सोनाळकर उपस्थित होते.