‘नॅक’ सादरीकरणाची ठिकाणे, स्मार्ट क्लासरूमची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:28 AM2021-03-09T04:28:15+5:302021-03-09T04:28:15+5:30

‘नॅक‘ तयारीअंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या तयारीचा आढावा सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने घेण्यात आला. ...

‘NAC’ presentation venues, smart classroom inspections | ‘नॅक’ सादरीकरणाची ठिकाणे, स्मार्ट क्लासरूमची तपासणी

‘नॅक’ सादरीकरणाची ठिकाणे, स्मार्ट क्लासरूमची तपासणी

Next

‘नॅक‘ तयारीअंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या तयारीचा आढावा सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने घेण्यात आला. त्यानंतर दुपारी तीन वाजल्यापासून कुलगुरू डॉ. शिर्के आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत यांनी मानव्यशास्त्र इमारत, वि. स. खांडेकर भाषा‌भवनमधील विविध अधिविभाग, तर विद्यार्थी भवनाला भेट दिली. प्र-कुलगुरू डॉ. पाटील आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख यांनी विज्ञान विद्याशाखेशी संबंधित अधिविभागांना भेटी दिल्या. या विभागांमधील स्मार्ट क्लासरूम सुरू आहेत का?, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेणाऱ्या सुविधांची व्यवस्था, सादरीकरणाच्या ठिकाणांवरील स्थिती, रंगरंगोटी व डागडुजी, साधनसामग्री, आदींची तपासणी केली. सोशल डिस्टन्सिंग, साफसफाई, नॅक समितीसमोर सादरीकरणाबाबतच्या काही सूचना यावेळी विभागप्रमुखांना करण्यात आल्या. सायंकाळी सहापर्यंत ही पाहणी सुरू होती.

चौकट

परीक्षा समितीची आज बैठक

हिवाळी सत्रातील परीक्षा घेण्याबाबत गुळवणी समितीने केलेल्या शिफारशीनुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाने शनिवारी (दि. ६) या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबतच्या नियोजनासाठी आज, मंगळवारी सायंकाळी पाच वाजता या समितीची बैठक होणार आहे.

Web Title: ‘NAC’ presentation venues, smart classroom inspections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.