नागाळा पार्क युवक मंडळ विजेता-श्री श्री टी-२० क गट क्रिकेट स्पर्धा; अक्षय भिडेची अष्टपैलू कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:07 AM2018-05-04T00:07:49+5:302018-05-04T00:07:49+5:30

कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने व विनोदकुमार सचदेव पुरस्कृत श्री श्री टी-२० क्रिकेट स्पर्धेतील

 Nagala Park Youth Team Winners - Sri Sri T-20C Group Cricket Tournament; Akshay Bhee's all-round performance | नागाळा पार्क युवक मंडळ विजेता-श्री श्री टी-२० क गट क्रिकेट स्पर्धा; अक्षय भिडेची अष्टपैलू कामगिरी

नागाळा पार्क युवक मंडळ विजेता-श्री श्री टी-२० क गट क्रिकेट स्पर्धा; अक्षय भिडेची अष्टपैलू कामगिरी

Next

कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने व विनोदकुमार सचदेव पुरस्कृत श्री श्री टी-२० क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात नागाळा पार्क युवक मंडळाने मालती पाटील क्रिकेट क्लबवर११ धावांनी विजय मिळवित स्पर्धेतील विजेतेपद पटकावले.
प्रथम नागाळा पार्क युवक मंडळाने २० षटकांत ५ बाद १३७ धावा केल्या. अक्षय भिडेने ४५, स्वप्निल बार्शीकरने १८, रोहन परांजपेने नाबाद १६, सोहम कुलकर्णीने १२ व अमूल्य नाथूने १० धावा केल्या. मालती पाटील क्लबकडून प्रथमेश बाजारी, अनिकेत नलवडे, तुषार पाटील, शुभम नलवडे व हर्षवर्धन पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.उत्तरादाखल खेळताना मालती पाटील क्रिकेट क्लबने १९.२ षटकांत सर्वबाद १२६ धावा केल्या. यामध्ये आशितोष माळीने २२, रोहन भाटले व तुषार पाटील यांनी प्रत्येकी १९, प्रथमेश बाजारी १५ व विनायक कोळेकरने नाबाद ११ धावा केल्या. गोलंदाजी करताना नागाळा पार्क युवक मंडळाकडून अक्षय भिडे, सोहम कुलकर्णी व योगेश वाठारे यांनी प्रत्येकी २ व तेजस जोशीने १ गडी बाद केला. अशा प्रकारे नागाळा पार्क युवक मंडळाने ११ धावांनी विजय मिळविला.

विजयी संघात अक्षय भिडे (कर्णधार), अमूल्य नाथू, स्वप्निल बार्शीकर, सोहम कुलकर्णी, रोहन परांजपे, स्वप्निल साळवी, अथर्व देवण्णावर, तेजस जोशी, क्षितिज पाटील, वैभव क्षीरसागर, योगेश वाठारे, नितीन गंधडे यांचा समावेश होता. संघाला प्रशिक्षक अरुण नाथू यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title:  Nagala Park Youth Team Winners - Sri Sri T-20C Group Cricket Tournament; Akshay Bhee's all-round performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.