आजऱ्यातील धोकादायक झाडे तोडल्याबद्दल नगरपंचायतीचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:28 AM2021-09-04T04:28:31+5:302021-09-04T04:28:31+5:30
आजऱ्याच्या जनावरांच्या बाजारातील धोकादायक स्थितीत असणारी झाडे तोडण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून केली होती. यावर्षीच्या पावसाळ्यात ...
आजऱ्याच्या जनावरांच्या बाजारातील धोकादायक स्थितीत असणारी झाडे तोडण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून केली होती. यावर्षीच्या पावसाळ्यात यातील काही झाडे वाकली होती. दोन्ही गल्लीच्या मधोमध वाढलेली ही झाडे मोठ्या पावसात कोणत्या क्षणी नागरिकांच्या घरावर कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता होती. ही सर्व झाडे निरूपयोगी असून त्या झाडाची पाणी कुजत नसल्याने सर्वत्र दलदल निर्माण झाली आहे. त्यातून डासांची उत्पत्ती होत असून डेंग्यू, मलेरियासारखे साथीचे आजार पसरत आहेत. ही झाडे तोडल्याने अशा आजारांपासून नागरिकांची सुटका होणार आहे. त्यामुळे नगरपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याची दखल घेत व संभाव्य हानी टाळत धोकादायक स्थितीतील झाडे तोडून नागरिकांचे प्राण वाचविले आहेत. या कामाचे कौतुक करीत मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांना अभिनंदनाचे पत्र दिले आहे. पत्रावर डॉ. अनिल देशपांडे, विनय सबनीस, अनंत मायदेव, वासुदेव मायदेव, के. जे. देशमाने, शिल्पा लिंगम, किशोर परीट, आनंदा शिंदे, शशिकांत चराटी यांसह परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत.