नागदेववाडीत लाखांचा ऐवज लंपास, सोने, चांदीच्या वस्तूंचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 04:39 PM2020-02-18T16:39:25+5:302020-02-18T16:41:38+5:30
बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्याने सव्वाचार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तूसह एलईडी टीव्हीसह १० हजारांची रोकड लंपास केली. १५ ते १६ फेब्रुवारी दरम्यान जिल्हा परिषद कॉलनी, नागदेववाडी (ता. करवीर) येथे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मिथीलेश दिलीप भोसले (वय ३१) यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दाखल केली. मुद्देमालाची सुमारे एक लाख रुपये किंमत आहे.
कोल्हापूर : बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्याने सव्वाचार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तूसह एलईडी टीव्हीसह १० हजारांची रोकड लंपास केली. १५ ते १६ फेब्रुवारी दरम्यान जिल्हा परिषद कॉलनी, नागदेववाडी (ता. करवीर) येथे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मिथीलेश दिलीप भोसले (वय ३१) यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दाखल केली. मुद्देमालाची सुमारे एक लाख रुपये किंमत आहे.
पोलिसांनी सांगितले, भोसले कामानिमित्त परगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या जिल्हा परिषद कॉलनीतील बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून प्रवेश केला.
बेडरूममधील तिजोरी आणि कपाटाचा दरवाजा उचकटला. त्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे एक गंठण, अर्धा तोळा वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे डूल, ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे एक ताह्मण, २५० ग्रॅम वजनाचे चांदीचे एक ताट, १० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण असा मुद्देमाल लंपास केला.
दरम्यान, भोसले गावावरून परत आल्यानंतर चोरीचा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटे पसार झाले होते.