नागदेववाडीचे वळण ठरतेय अपघाताचे ठिकाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:23 AM2021-04-10T04:23:08+5:302021-04-10T04:23:08+5:30

कोपार्डे : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर अपघाताला आमंत्रण देणारे अनेक ब्लँक स्पॉट आहेत. यातील नागदेववाडी फाटा येथील वळण धोकादायक व ...

Nagdevwadi turn is the place of accident | नागदेववाडीचे वळण ठरतेय अपघाताचे ठिकाण

नागदेववाडीचे वळण ठरतेय अपघाताचे ठिकाण

Next

कोपार्डे : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर अपघाताला आमंत्रण देणारे अनेक ब्लँक स्पॉट आहेत. यातील नागदेववाडी फाटा येथील वळण धोकादायक व अपघात प्रवण असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न केल्याने सातत्याने अपघात घडत आहेत.

भोगावती नदीवर असलेल्या बालिंगा पुलापासून नागदेववाडी फाटा ते बालिंगा दरम्यान मोठे वळण आहे. या वळणाच्या दुतर्फा दाट झुडपे व उंंच सखल उतार आहेत. यामुळे वाहनचालकाला समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यातच या अर्ध्या किमी अंतराच्या रस्त्यावर नागदेववाडी गावात जाण्यासाठी फाटा आहे. तसेच बालिंगा गावात जाण्यासाठी ही रस्ता आहे. मात्र दिशादर्शक अथवा तीव्र वळणाचे सूचना फलक अथवा दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. यामुळे शहराकडे अथवा गगनबावडा बाजूला जाणाऱ्या वाहनांना नागदेववाडी अथवा बालिंगा गावात वळणारी वाहने अचानक इंडिकेटर न लावता वळण घेतल्यास हमखास अपघात घडतात

सकाळी व सायंकाळी या मार्गावर फारच मोठी रहदारी असते. जवळच महादेवाचे मंदिर आहे. परिसरातील भाविक येथे मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. यामुळे पायी चालत जाणाऱ्यांसाठी आपला जीव धोक्यात घालून चालावे लागते. या ठिकाणी अपघातात चार ते पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासाठी येथे वळणाबाबत सूचना फलक झेब्रा क्रॉसिंग दिशादर्शक लावण्यांबरोबरच वाहनांचा वेग कमी येण्यासाठी पांढरे पट्टे टाकण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया

योगेश ढेंगे (सरपंच नागदेववाडी) रस्त्याला तीव्र वळण,उंचसखल भाग आहे. समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असणारी झुडपे साफसफाई करणे आवश्यक आहे. याचबरोबर वेगावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा येथे आवश्यक आहे

फोटो नागदेववाडी ता. करवीर येथे धोकादायक वळण

Web Title: Nagdevwadi turn is the place of accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.