‘कंपनी सेक्रेटरी’ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदी नागेंद्र राव, उपाध्यक्षपदी देवेंद्र देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:11 AM2021-02-05T07:11:01+5:302021-02-05T07:11:01+5:30
कोल्हापूर : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या (आयसीएसआय)च्या अध्यक्षपदी नागेंद्र राव (बंगलोर), उपाध्यक्षपदी देवेंद्र देशपांडे (पुणे), वेस्टर्न इंडिया ...
कोल्हापूर : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या (आयसीएसआय)च्या अध्यक्षपदी नागेंद्र राव (बंगलोर), उपाध्यक्षपदी देवेंद्र देशपांडे (पुणे), वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या अध्यक्षपदी पवन चांडक (पुणे) आणि कोल्हापूर विभागाच्या अध्यक्षपदी अमित पाटील यांची निवड झाली. ‘आयसीएसआय’च्यावतीने या विभागनिहाय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्याची माहिती नूतन अध्यक्ष राव यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
आयसीएसआयचे मुख्यालय दिल्ली येथे असून देशात एकूण ७२ विभाग (चॅप्टर) आहेत. त्यातील वेस्टर्न इंडिया रिजनमध्ये कोल्हापूर, औरंगाबाद, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे, भाईंदर, पुणे आदी नऊ विभाग आहेत. आयसीएसचे एकूण ६५ हजार सदस्य, तर सुमारे तीन लाख विद्यार्थी आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाला मार्गदर्शन, जीएसटी, आयकर आदींबाबतची कामे सीएस करतात. आमच्या इन्स्टिट्यूटच्या विभागांमध्ये सीएस अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन केले जाते. सीएस अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी नव्या नियमानुसार २१ महिने करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी यावर्षीपासून होईल. सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम आम्ही राबवितो. ‘शहीद की बेटी’ या उपक्रमासाठी गेल्यावर्षी २५ लाखांची मदत आम्ही केली असल्याचे नागेंद्र राव यांनी सांगितले. सीएस घडविण्याचे काम आम्ही करतो. कोणत्याही शाखेचा पदवीधर अथवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला सीएस अभ्यासक्रम करता येत असल्याचे देवेंद्र देशपांडे यांनी सांगितले. सीएसची सध्याची संख्या लक्षात घेता, या क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी विद्यार्थ्यांना असल्याचे अमित पाटील यांनी सांगितले.
चौकट
कोल्हापूरची कार्यकारिणी
दरम्यान, कोल्हापूर विभागाच्या सात सदस्य कार्यकारिणीची मुदत चार वर्षांची आहे. त्यामध्ये अमित पाटील (अध्यक्ष), कपिला टिक्के (उपाध्यक्ष), ऐश्वर्या तोरस्कर (सचिव), जोतिबा गावडे (खजानिस), शीतल महामुनी, अमित पसारे, अमर पाटील (सदस्य) यांचा समावेश आहे.
फोटो (०१०२२०२१-कोल-नागेंद्र राव (सीएस), देवेंद्र देशपांडे (सीएस), पवन चांडक (सीएस), अमित पाटील (सीएस)