गतिमंद मुलांना दूध वाटून भडगावात नागपंचमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:30 AM2021-08-14T04:30:30+5:302021-08-14T04:30:30+5:30

भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे राष्ट्रीय बसव दलाच्या कार्यकर्त्यांनी गतिमंद मुलांना दूध वाटप करून नागपंचमी साजरी केली. याठिकाणी सलग १५ ...

Nagpanchami in Bhadgaon by distributing milk to fast moving children | गतिमंद मुलांना दूध वाटून भडगावात नागपंचमी

गतिमंद मुलांना दूध वाटून भडगावात नागपंचमी

Next

भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे राष्ट्रीय बसव दलाच्या कार्यकर्त्यांनी गतिमंद मुलांना दूध वाटप करून नागपंचमी साजरी केली. याठिकाणी सलग १५ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. १२ व्या शतकातील पुरोगामी समाजसुधारक जगद्गुरू महात्मा बसवेश्वरांचे महानिर्वाण नागपंचमीच्या दिवशीच झाले. देश-विदेशातील बसवदलाचे कार्यकर्ते नागपंचमीच्यादिवशी बसवपंचमी अनोख्या पद्धतीने साजरी करतात. चिखलाच्या किंवा धातूच्या नागोबाला दुधाचा अभिषेक न घालता ते दूध एकत्र गोळा करून गावातील शाळकरी मुलांना वाटण्याचा उपक्रम भडगावमध्ये दरवर्षी राबविला जातो. याकामी रवी शेंडुरे, सिद्धाप्पा चिनगुडे, गणेश कोरी आदींचे सहकार्य आहे.

सकाळी श्री कल्लेश्वर मंदिरात बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन व बसव वचनांचे पठण करण्यात आले. त्यानंतर चैतन्य अपंगमती विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांना दुधाचे वाटप करण्यात आले.

यावेळी जि.प. सदस्या राणी खमलेट्टी, सरला कोरी, सुरेखा कोरी, महादेवी चौगुले, गंगुबाई चौगुले, अलका कित्तूरकर, सविता कोरी, पूजा कोरी, लक्ष्मीबाई निंगनुरे, शैलजा कोरी, लक्ष्मी कोरी आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील कल्लेश्वर मंदिरात रत्नमाला कित्तूरकर यांनी बसव वचनांचे पठण केले. यावेळी उपस्थित महिला भगिनी.

क्रमांक : १३०८२०२१-गड-१७

Web Title: Nagpanchami in Bhadgaon by distributing milk to fast moving children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.