राज्यस्तर टेनिक्वाईट स्पर्धेत नागपूर सर्वसाधारण विजेतेपद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 05:19 PM2018-11-22T17:19:38+5:302018-11-22T17:20:24+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर टेनिक्वाईट स्पर्धेत नागपूर जिल्हा संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.कुडीत्रे ...

Nagpur general championship in state-level techwight competition | राज्यस्तर टेनिक्वाईट स्पर्धेत नागपूर सर्वसाधारण विजेतेपद 

राज्यस्तर टेनिक्वाईट स्पर्धेत नागपूर सर्वसाधारण विजेतेपद 

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर टेनिक्वाईट स्पर्धेत नागपूर जिल्हा संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.कुडीत्रे येथील डी.सी.नरके विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या यास्पर्धेत राज्यातील २४ संघांनी सहभाग घेतला होता.

यात मुलांमध्ये पुणे (प्रथम), भंडारा (द्वितीय),, सांगली (तृतीय), नंदुरबार(चतुर्थ), मुलींमध्ये भंडारा, नागपूर शहर, पुणे, वाशिम. एकेरीत प्रणव पाटील (पुणे), ओम ठाकरे (नागपूर शहर), सौमित्र जोशी (सांगली), अमर माणकर(नागपूर शहर), तर मुलींमध्ये अनुष्का मुसळे (नागपूर), श्रृती भुसे (भंडारा), जान्हवी कुलकर्णी (पुणे), ऋतिका ओसवाल (पुणे). दुहेरीत पियुष तांबडे-तुषार बारसागडे (नागपूर शहर), ओंकार ढावारे-अभिजीत दौंडकर (पुणे), साहिल कडव-गौरव मत्ते(भंडारा), चेतन वासुदेवे-अमन घुले (नागपूर ग्रामीण), मुलींमध्ये मृदुला ठाकरे-रूपाली ठेरे (नागपूर शहर), निर्मयी मेकाले-सायली जोशी (पुणे), पायल डोंगरे-प्राजक्ता रंगारी (नागपूर ग्रामीण). याचा समावेश होता. सर्वसाधारण विजेतेपद नागपूरने तर, उपविजेतेपद पुणे व तृतीय क्रमांक भंडारा जिल्हा संघाने पटकाविला.

स्पर्धेचा बक्षिस समारंभ गोकूळचे ज्येष्ठ संचालक अरूण नरके यांच्या हस्ते झाला. यावेळी राज्य टेनिक्वाईट असोसिएशनचे सचवि अनिल वरपे, उपाध्यक्ष डॉ. अभिजीत वणिरे, सुधीर फटींग(नागपूर), संजय कुडूपले(अकोला), अ‍ॅड. मृणाल बांडेबुचे (भंडारा), जिल्हा संघटनेचे पदाधिकारी अरूण शिंदे, सुहास साळोखे, बळीराम बामणे आदी मान्यवर उपस्थित होते.


कुडीत्रे (ता.करवीर) येथील डी.सी.नरके विद्यानिकेतन येथे झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर टेनिक्वाईट स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद मिळवलेल्या नागपूर संघास गोकूळचे ज्येष्ठ संचालक अरूण नरके यांच्या हस्ते चषक बहाल करण्यात आला.यावेळी डॉ. अभिजीत वणिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
 

Web Title: Nagpur general championship in state-level techwight competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.