डंपर-दुचाकी अपघातात नागठाणेची विवाहिता ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:42 PM2019-06-10T23:42:42+5:302019-06-10T23:46:28+5:30
टोप-जोतिबा मार्गावर सादळे (ता. करवीर) गावच्या घाटात मोटारसायकल आणि वाळूचा डंपर यांच्यात झालेल्या अपघातात अश्विनी संदीप पाटील (वय ३५, रा. नागठाणे, ता. पलूस) या जागीच ठार झाल्या तर पती संदीप दिनकर पाटील (वय ४०)हे गंभीर जखमी
शिरोली : टोप-जोतिबा मार्गावर सादळे (ता. करवीर) गावच्या घाटात मोटारसायकल आणि वाळूचा डंपर यांच्यात झालेल्या अपघातात अश्विनी संदीप पाटील (वय ३५, रा. नागठाणे, ता. पलूस) या जागीच ठार झाल्या तर पती संदीप दिनकर पाटील (वय ४०)हे गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात सायंकाळी सहाच्या सुमारास जेनेसिस इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाठीमागील बाजूस झाला. संदीप व अश्विनी पाटील हे नागठाणे येथून जोतिबा दर्शनासाठी मोटारसायकलवरून आले होते. सायंकाळी पाच वाजता जोतिबाचे दर्शन घेऊन ते घरी परतीच्या मार्गाला लागले. गिरोली, सादळे-मादळेमार्गे घाटमार्गावरून जात असताना त्याचवेळी टोप येथून सादळे गावाकडे वाळू घेऊन येणारा डंपर आणि मोटारसायकल यांच्यात धडक झाली. त्यामध्ये डंपरच्या पाठीमागील चाकात सापडल्याने अश्विनी जागीच ठार झाल्या तर पती संदीप गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संदीप पाटील हे भारती विद्यापीठ (दिल्ली) येथे नोकरीला आहेत. या घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.