वाणिज्य : गायत्री पटेलची वन ड्रीम वन राइड मोहीम सुरू; तीस हजार किलोमीटरचा प्रवास : सहा महिने देश पालथा घालणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:24 AM2020-12-06T04:24:45+5:302020-12-06T04:24:45+5:30
यावेळी आमदार पाटील, महापौर निलोफर आजरेकर यांनी गायत्रीला सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. एकतीस वर्षीय गायत्री व्यवसायाने इंटेरिअर डिझायनर आहे. ...
यावेळी आमदार पाटील, महापौर निलोफर आजरेकर यांनी गायत्रीला सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. एकतीस वर्षीय गायत्री व्यवसायाने इंटेरिअर डिझायनर आहे. भारतात अनेक महिला दुचाकीवरून मोहिमा करताना तिने वाचले व पाहिले होते. आपणही अशा प्रकारे काही वेगळं करावे असे गायत्रीने ठरवले आणि २०१७ पासून गायत्रीने दुचाकीवरील प्रवासाला सुरुवात केली. आजअखेर गायत्रीने देशाच्या वेगवेगळ्या भागात टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० या दुचाकीवरून ६५ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे.
२८ राज्ये.. १८ जागतिक वारसा स्थळे..
वन ड्रीम वन राइड मोहिमेत गायत्री भारतातील अठ्ठावीस राज्ये, आठ केंद्रशासित प्रदेश आणि अठरा जागतिक वारसा स्थळांना भेटी देणार आहे. ही मोहीम जून २०२१ पर्यंत पूर्ण होईल.
कोट :
महिलांमध्ये प्रवासाची आवड निर्माण व्हावी व अधिकाधिक स्त्रियांनी अशा मोहिमा राबवाव्यात यासाठीच मी ही मोहीम करत आहे.
गायत्री पटेल
०५१२२०२०-कोल-गायत्री पटेल
कोल्हापूरच्या गायत्री पटेलला झेंडा दाखवून शनिवारी आमदार ऋतुराज पाटील यांनी भारत प्रवासाला शुभेच्छा दिल्या. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, मोहन ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक तेज घाटगे, संचालक दिग्विजय राजेभोसले, टीव्हीएसचे विभागीय व्यवस्थापक रोहित श्रीवास्तव, माई टीव्हीएसचे अनिल कांबळे व मान्यवर उपस्थित होते.