खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर अभियानाला प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 02:08 PM2021-01-04T14:08:55+5:302021-01-04T14:12:24+5:30

Tree Satejpatil Kolhapur- झाडांना मोकळा श्वास घेण्यासाठी खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर या मोहिमेला रविवारी सकाळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ताराराणी चौकातून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. शहरातील पन्नासहून अधिक स्वयंसेवी संस्थांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. दिवसभर राबविलेल्या या मोहिमेत हजारो फलक काढण्यात आले.

Nail-free trees respond to Kolhapur campaign | खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर अभियानाला प्रतिसाद 

खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर अभियानाला प्रतिसाद 

Next
ठळक मुद्देएकच नारा एकच सुर, खिळेमुक्त कोल्हापूरपालकमंत्री सतेज पाटील यांची संकल्पना

कोल्हापूर : झाडांना मोकळा श्वास घेण्यासाठी खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर या मोहिमेला रविवारी सकाळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ताराराणी चौकातून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. शहरातील पन्नासहून अधिक स्वयंसेवी संस्थांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. दिवसभर राबविलेल्या या मोहिमेत हजारो फलक काढण्यात आले.

या मोहिमेत स्वत: पालकमंत्री पाटील यांनीही सहभागी होत विविध ठिकाणी झाडांवर मारलेले फलक आणि खिळे काढले. सर्वच स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित येत कोल्हापुरातील सर्व झाडे खिळेमुक्त करावीत. तसेच ही मोहीम केवळ जिल्ह्यापुरती न ठेवता राज्यभरातील वृक्षप्रेमींनी हाती घ्यावी, असे आवाहनही मंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केले.

जगभरातील प्रदूषण रोखण्यासाठी सर्वत्र ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे. तरीसुद्धा झाडे जगविण्याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. अनेक महाभाग तर थेट झाडांवर आपल्या जाहिरातीचे फलक लावतात. त्यासाठी झाडांवर खिळे ठोकतात. त्यामुळे त्या झाडालाही संवेदना आहेत, हे आपण विसरून गेले आहोत. त्यामुळे ‘खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ ही मोहीम पालकमंत्री पाटील यांच्या संकल्पनेतून विविध स्वयंसेवी संस्थांनी हाती घेतली आहे. त्याची सुरुवात ताराराणी चौकातून पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाली.

यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, माजी अध्यक्ष आनंद माने, वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अमोल बुड्डे, रोटरी मूव्हमेंट व रोटरी स्मार्ट सिटी क्लबचे बाबा जांभळे, अरविंद कृष्णन, सिद्धार्थ पाटणकर, विश्वजित जाधव, सूर्यकांत बुधळकर, सागर सरनाईक, शरद पाटील, निलव्ह केडिया, अनुप पाटील, अमर पंजवाणी, शिवाजी भोसले, वारणा वडगावकर, प्रतिभा शिंगारे, राहुल देसाई, स्वप्निल मुधाळे, करण पारीख, गौरी शिरगावकर, एन. एन. अत्तार, बयाजी शेळके, अतुल पाटील, अभय जायभये, यशवंत शिंदे, प्रशांत जाधव, प्रमोद चौगुले, अशोक रोकडे, सूर्यकांत पाटील, विश्वजित जाधव, अमर आडके, अनिकेत अष्टेकर, दीपक थोरात, आदी उपस्थित होते.

सन १९७५च्या वन कायद्यानुसार झाडांना इजा पोहोचविणे, त्यांच्यावर खिळे ठोकणे असे कृत्य गुन्हा आहे. त्यामुळे यापुढे झाडांवर खिळे मारणाऱ्यांना अथवा जाहिरात फलक लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना महापालिकेला दिल्या आहेत.
- सतेज पाटील,
पालकमंत्री

या संस्था सहभागी

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इजिनिअरिंग, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, कोल्हापूर आर्ट फाऊंडेशन, विज्ञान प्रबोधिनी, राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ, ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन, सुमन साळवी व बालविकास संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, रोटरी स्पेक्ट्रम, हॉरिझन, स्मार्ट सिटी, जिल्हा युवक काँग्रेस, निसर्गमित्र, मैत्रेय प्रतिष्ठान, व्हाईट आर्मी, वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन, शिरोली एम. आय. डी. सी, रोटरी क्लब ऑफ सनराईज, गार्गीज, एनएसयूआय, दुर्गेश लिंग्रस यांचा ग्रुप, आदींचा सहभाग होता.

या मार्गावरील झाडे खिळेमुक्त

राजाराम टिंबर मार्केट - साळोखेनगर पाण्याची टाकी, रेणुका मंदिर ते सुभाषनगर चौक, पाण्याचा खजिना परिसर, बेलबाग - मंगेशकरनगर, क्रशर चौक ते अंबाई टँक, मिरजकर तिकटी, सोन्या मारुती मंदिर - दसरा चौक, नाईक आणि कंपनी ते महाराणा प्रताप चौक, कोंडा ओळ ते महाराणा प्रताप चौक, टायटन शोरूम चौक - गोखले कॉलेज चौक, दसरा चौक ते बिंदू चौक, प्रायव्हेट हायस्कूल, खासबाग परिसर, सीपीआर रुग्णालय - महापालिका ते छत्रपती शिवाजी चौक, रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर, मेन रोड लक्ष्मीपुरी ते चांदणी चौक, दत्तमंदिर ते उमा टॉकीज, शिवाजी स्टेडियम ते गोखले कॉलेज रोड, जयप्रभा स्टुडिओ ते यल्लमा मंदिर, भगवा चौक ते एसपी ऑफिस, एसपी ऑफिस चौक ते महावीर कॉलेज, पितळी गणपती ते धैर्यप्रसाद हॉल, ताराराणी चौक ते सयाजी हॉटेल, ताराराणी चौक ते दाभोळकर कॉर्नर, सासने मैदान ते आदित्य कॉर्नर, महावीर कॉलेज ते जिल्हाधिकारी कार्यालय - असेंब्ली रोड, जिल्हा परिषद परिसर, जी. एस. टी. कार्यालय परिसर, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, राजारामपुरी पहिली ते १२ वी गल्ली, टाकाळा परिसर, कावळा नाका ते मार्केट यार्ड, शिवाजी विद्यापीठ ते सायबर चौक, शाहूपुरी चौथी व पाचवी गल्ली, शिवाजी उद्यमनगर ते वाय. पी. पोवार चौक, शाहू टोलनाका ते कृषी महाविद्यालय, राजारामपुरी जनता बझार चौक, आदी मार्गांवरील झाडे खिळेमुक्त करण्यात आली.

 

Web Title: Nail-free trees respond to Kolhapur campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.