ईदनिमित्त आज कोल्हापूर मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर नमाज पठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:08 AM2018-08-22T01:08:15+5:302018-08-22T01:12:34+5:30
मुस्लिम बांधवांची बकरी ईद आज, बुधवारी सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर सकाळी नऊ वाजता मुफ्ती इर्शाद कुन्नुरे हे पहिल्या जमातीचे नमाज व खुतबा पठण करणार आहेत.
कोल्हापूर : मुस्लिम बांधवांची बकरी ईद आज, बुधवारी सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर सकाळी नऊ वाजता मुफ्ती इर्शाद कुन्नुरे हे पहिल्या जमातीचे नमाज व खुतबा पठण करणार आहेत.मुस्लिम बोर्डिंग येथे हिलाल कमिटीची बैठक मौलाना मस्नूर आलम कासमी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अन्य शहरांतील कमिटीच्या सदस्यांची चर्चा केल्यानंतर आज, बुधवारी बकरी ईद साजरा करण्याचा निर्णय झाला. यावेळी चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी उपस्थित होते. त्यानुसार आज शहरातील मशिदींमध्ये नमाज व खुतबा पठण होणार आहे.
नमाजची वेळ पुढीलप्रमाणे
१. कसाब मशीद : सकाळी ६ वाजून ४० मिनिटे.
२. घिसाडगल्ली, वाय. पी. पोवारनगर : सकाळी ७ वाजता
३. बाराइमाम, सदर बझार, बाबूजमाल, कनाननगर, बडी मस्जीद : सकाळी ७ वाजून ३० मिनिटे.
४. सरनाईक वसाहत : ७ वाजून ४५ मिनिटे
५. कब्रस्तान मशीद, यादवनगर, प्रगती कॉलनी, मणेर मशीद, साकोली कॉर्नर, सरदार कॉलनी, ताराबाई पार्क, सिरत मोहल्ला, प्रगती कॉलनी, मदिना कॉलनी, उचगाव, गवंडी मोहल्ला, अकबर मोहल्ला : सकाळी ८ वाजता
६. टाकाळा सरदार कॉलनी, जमादार कॉलनी : सकाळी ८ वाजून १५ मिनिटे.
७. घुडणपीर मस्जिद, न्यू शाहूपुरी, विचारेमाळ, शाहू कॉलनी, उत्तरेश्वर, केसापूर मस्जिद : सकाळी ८ वाजून ३० मिनिटे.
८. मुस्लिम बोर्डिंग, इदगाह पहली जमात, शाहूपुरी मस्जिद, मुडशिंगी, बडी मस्जिद, राजेबागस्वार : सकाळी ९ वाजता
९. नंगीवली इदगाह, मुडशिंगी : सकाळी ९.३० वाजता
उघड्यावर कुर्बानी नको,
कोल्हापूर : शहरात आज, बुधवारी साजरी होत असलेल्या बकरी ईद सणानिमित्त कुर्बानी विधी अंतर्गत लहान जनावरे शेळी, मेंढी ही महानगरपालिकेच्या बापट कॅम्प येथे तसेच मोठी जनावरे म्हैसवर्गीय सदरबाजार कत्तलखाना येथे कुर्बानीची व्यवस्था करण्यात आली असून, सदर कत्तलखाने सोडून इतरत्र कोठेही उघड्यावर लहान अथवा मोठी जनावरांची कुर्बानी
करू नये, असे आवाहन महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.