मलाबादे यांचे चौकातून नाव गायब

By admin | Published: March 3, 2017 11:01 PM2017-03-03T23:01:20+5:302017-03-03T23:01:20+5:30

नगरपालिका, संघटनेचे दुर्लक्ष : अक्षरे निखळून पडली; सुशोभीकरणाची मागणी

The name disappeared from the chawkby of Malabade | मलाबादे यांचे चौकातून नाव गायब

मलाबादे यांचे चौकातून नाव गायब

Next

इचलकरंजी : शहरातील मुख्य मानला जाणारा जनता चौक आपला करण्यासाठी अनेकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. मात्र, यंत्रमाग कामगारांना हक्क मिळवून देणारे चळवळीतील नेते कॉ. के. एल. मलाबादे यांचे नाव देण्याचा ठराव नगरपालिकेने केला. त्यानंतर चौकाचे सुशोभीकरण करून त्यावर मलाबादे यांचे नाव लावण्यात आले; परंतु काही काळातच चौकाभोवती लावण्यात आलेल्या फलकाची दुरवस्था झाली आणि मलाबादेंचे नावही एकेक करीत निखळून पडले. याकडे नगरपालिकेकडे पाठलाग करून, ठराव करून घेणाऱ्या लालबावटा संघटनेने लक्ष दिले नाही.
इचलकरंजी शहरामध्ये महापुरुषांची जयंती, गणेशोत्सव मिरवणूक, भारताने जिंकलेला क्रिकेट सामना, शहरासाठी महत्त्वाचा एखादा ठराव झाल्यास अशा सर्व प्रमुख निमित्ताने एकत्रित जमून आनंदोत्सव साजरा करणे. त्याचबरोबर आंदोलने, निदर्शने यासाठी शहरातील मुख्य मानला जाणारा ‘चौक’ म्हणून या जनता चौकाची प्रचिती आहे. या चौकाला आपले नाव द्यावे.
आपल्या व्यक्तीचा, समाजाच्या प्रमुखाचा पुतळा उभा करावा, यासाठी अनेकजण नजरा लावून बसले होते. दरम्यान, इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगातील मुख्य घटक असलेल्या यंत्रमाग कामगारांचे प्रतिनिधित्व करून चळवळीतून सातत्याने पाठपुरावा करीत न्याय व हक्क मिळवून देणारे म्हणून प्रसिद्ध असणारे माजी आमदार कॉ. के. एल. मलाबादे यांची आठवण शहराला राहावी. भावी पिढीला आदर्श मिळावा, यासाठी मलाबादे यांचे नाव या चौकाला द्यावे, अशी मागणी लालबावटा संघटनेच्यावतीने जोर धरू लागली.
संघटनेच्यावतीने यासाठी आंदोलने केली. नगरपालिकेला निवेदन दिले. त्यावेळी नाव देण्यावरून बरेच वादंग उठले होते. त्यानंतर नगरपालिकेत सत्तांतर होताना मलाबादे यांच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा ‘हातभार’ लागला. त्यावेळी त्या कार्यकर्त्यानेही ही मागणी उचलून धरली. त्यास मंजुरी देत तत्कालीन नगराध्यक्षा व पदाधिकाऱ्यांनी ठराव करून चौकाचे नामकरण केले.
हा ठराव झाल्यानंतर लालबावटा संघटनेच्यावतीने साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. चौकाच्या चोहोबाजूंनी फलक उभारून त्यावर कॉ. के. एल. मलाबादे चौक, असे लिहिण्यात आले. मात्र, कालांतराने याकडे दुर्लक्ष झाल्याने मलाबादे यांचे नाव एकेक करीत निखळून पडले. संघटनेने व नगरपालिका प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून चौकाचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)


इचलकरंजीतील के. एल. मलाबादे चौकात मलाबादे यांचे नामकरण झाल्यानंतर चोहोबाजूने लावलेल्या फलकावरून मलाबादे यांच्या नावातील काही अक्षरे निघून गेल्याचे एक महिन्यापूर्वी चित्र होते.

Web Title: The name disappeared from the chawkby of Malabade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.