प्रशिक्षणाच्या नावाखाली शरद शेळकेंना पुण्याला हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 12:22 PM2019-12-05T12:22:01+5:302019-12-05T12:23:13+5:30

मटकाचालक सलीम मुल्ला रॅकेट प्रकरणातील संशयितांच्या नातेवाइकांना भेटायला दिल्याच्या कारणातून कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांना प्रशिक्षणाच्या नावाखाली पुण्याला पाठविले आहे.

In the name of training, Sharad moved the sheep to Pune | प्रशिक्षणाच्या नावाखाली शरद शेळकेंना पुण्याला हलविले

प्रशिक्षणाच्या नावाखाली शरद शेळकेंना पुण्याला हलविले

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापुरात न पाठविण्याचा फतवा : दत्तात्रय गावडे यांच्याकडे पदभारमटक्यातील आरोपींची नातेवाइकांना दिलेल्या भेटीचा ठपका

कोल्हापूर : मटकाचालक सलीम मुल्ला रॅकेट प्रकरणातील संशयितांच्या नातेवाइकांना भेटायला दिल्याच्या कारणातून कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांना प्रशिक्षणाच्या नावाखाली पुण्याला पाठविले आहे.

महिन्याभराचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होऊनदेखील आता पुन्हा कारागृहाकडे पाठविणार नसल्याचा फतवा काढून त्यांना पुण्यामध्येच ठेवले आहे. त्यांनी कैद्यांमध्ये केलेली सुधारणा, कारागृहाचा कायापालट यासह उद्योग, व्यवसाय सुरू करून राज्यात कारागृह अव्वलस्थानी नेऊन ठेवले होते.

अशा अधिकाऱ्यावर एकप्रकारे अन्याय केल्याची चर्चा कारागृह प्रशासनात आहे. दरम्यान येथील प्रभारी अधीक्षक हरीश्चंद्र जाधवर यांची बिंदू चौक सबजेलला बदली केली आहे. तर या ठिकाणी पुन्हा विसापूर (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथील खुल्या कारागृहाचे अधीक्षक दत्तात्रय गावडे यांची नियुक्ती केली आहे.

यादवनगर-पांजरपोळ येथे दि. ८ एप्रिल २०१९ च्या रात्री मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह त्यांच्या पथकावर माजी उपमहापौर शमा मुल्ला, तिचा पती सलिम मुल्ला याच्यासह ४०० जणांच्या जमावाने हल्ला करत बेदम मारहाण केली होती. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेत, मुल्ला गँगवर कठोर कारवाईचा पवित्रा घेऊन ‘मोक्का’ कारवाई केली.

सलिमच्या संपर्कात असणाऱ्या मटका-जुगाराचे मुंबईतील म्होरके प्रकाश सावला, जयेश शहा, वीरज सावला, जितेंद्र गोसालिया, राजेंद्र टोपी यांच्यासह स्थानिक सम्राट कोराणे, मनीष अग्रवाल यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली. ‘मोक्का’ कारवाईतील संशयित कळंबा कारागृहात आहेत. त्यांना भेटण्यासाठी नातेवाईक येत असतात.

मुंबईतील प्रकाश व वीरज सावला यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील कारागृहाबाहेर आले होते. त्यांना चालता येत नसल्याचे ते स्टेचरवरून आले होते. मुलाखत कक्षामध्ये भेट न देता कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर सावला बंधूंची वडिलांसोबत भेट घालून दिली.

अशा भेटी कारागृहात देत असतात, तसे कारागृह अधीक्षकांना अधिकार आहेत; परंतु सावला बंधू आणि वडिलांच्या भेटीचे पोलिसांनी व्हिडीओ चित्रीकरण करून, तसेच या गुन्ह्याच्या तपास अधिकारी उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी पत्र राज्याचे कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांना पाठविले. त्याची दखल घेत कारागृह अधीक्षक शेळके यांना एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठविले. प्रशिक्षण कालावधी पूर्ण होऊनदेखील त्यांना माघारी पाठविलेले नाही.
 

 

Web Title: In the name of training, Sharad moved the sheep to Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.