विद्यापीठाच्या २५० एकर जमिनीवर अजूनही जुन्या मालकांची नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:45 AM2021-03-13T04:45:09+5:302021-03-13T04:45:09+5:30

शासनाने विद्यापीठाला पूर्वी ८५३ एकर शेतजमिनीचे अधिग्रहण करून दिले. या सर्व जमिनीच्या सात-बारावर विद्यापीठाचे नाव असणे आवश्यक होते; मात्र ...

The names of the old owners are still on the 250 acres of university land | विद्यापीठाच्या २५० एकर जमिनीवर अजूनही जुन्या मालकांची नावे

विद्यापीठाच्या २५० एकर जमिनीवर अजूनही जुन्या मालकांची नावे

Next

शासनाने विद्यापीठाला पूर्वी ८५३ एकर शेतजमिनीचे अधिग्रहण करून दिले. या सर्व जमिनीच्या सात-बारावर विद्यापीठाचे नाव असणे आवश्यक होते; मात्र त्यातील २५० एकर जमिनीवर अजूनही जुन्या मालकांची नावे आहेत. ते केवळ अभियांत्रिकी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे झाले आहे. ‘नॅक’च्या पार्श्वभूूमीवर सुरू असलेल्या डागडुजी, रंगरंगोटीच्या कामातील भोंगळ कारभार आम्ही विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाच्या निदर्शनास आणून दिला; पण त्याबाबत या विभागाकडून काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या कारभारासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. निविदेप्रमाणे काम व्हावे अन्यथा मंगळवारी (दि. १६) आंदोलन करण्याचा इशारा मनविसेचे शहराध्यक्ष मंदार पाटील यांनी दिला. दरम्यान, आम्ही मांडलेल्या मुद्द्यांची कुलगुरुंनी गांभीर्याने दखल घेतली आहे. याबाबत चौकशी करण्याचे आदेश त्यांनी कुलसचिवांना दिले आहेत. दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही त्यांनी दिली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: The names of the old owners are still on the 250 acres of university land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.