श्रीमंतांची नावे दारिद्र्यरेषेखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2016 12:35 AM2016-10-22T00:35:45+5:302016-10-22T00:35:45+5:30
सन २००२ च्या बीपीएल यादीत बऱ्याच चुका झालेल्या आहेत. या यादीत श्रीमंतांची नावे टाकण्यात आली आहे.
सत्तेसाठी समविचारी आघाडीची गरज
काँग्रेस कार्यकर्त्यांचा सूर : आघाडीसाठी फरफटत जाणार नाही : पी. एन. पाटील
कोल्हापूर : जिथे सत्ता आहे, तिथे कार्यकर्ते शोधावे लागत नाहीत; पण जिथे नाही, तिथे अडचणी आहेत. काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी समविचारी आघाडी करण्याची गरज असल्याचा सूर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत उमटला. सन्मान राखून आघाडी झाली तर ठीक; अन्यथा कोणाच्याही मागे फटफटत जाणार नसल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील नऊ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेस कमिटीत कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये कार्यकर्त्यांनी उघड भूमिका मांडल्या. कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष जयरामबापू पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षासाठी चांगले वातावरण आहे, त्यामुळे काळजी करू नका. पक्षाच्या चिन्हावर लढण्यास हरकत नाही. गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली; पण शेवटपर्यंत उमेदवारीचा घोळ झाल्याने पक्ष अडचणीत आला. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी लक्ष घालावे, अशी मागणी सदाशिव पोकळकर (जयसिंगपूर) यांनी केली. जयसिंगपूरमध्ये विरोधक आघाडी करणार असले तरी आपण पक्षाच्या चिन्हावर लढवूया, असे शिरोळचे तालुकाध्यक्ष अनिल यादव यांनी सांगितले.
काँग्रेसमध्ये मरगळ आहे, हे खरे नसून सगळीकडे चांगले वातावरण आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून गटबाजी विसरून जिद्दीने कामाला लागून ‘हात’ चिन्हावर बहुमत आणूया, असे आवाहन माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी केले. जिल्ह्यात खरोखरच काँग्रेसला चांगले दिवस असून, नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्याचा दौरा करावा, असे माजी आमदार बजरंग देसाई यांनी सांगितले.
वातावरण चांगले जरी असले तरी स्थानिक परिस्थिती वेगळी असल्याचे सांगत आमदार सतेज पाटील म्हणाले, गतनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चिन्हावर उभे केले. त्याचे परिणाम काय झाले हे सर्वांना माहिती आहे. यासाठी स्थानिक पातळीवर जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागेल. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, काही कार्यकर्त्यांची आघाडीची मागणी आहे. पण सन्मान राखून आघाडी झाली तर ठीक, कोणाच्या मागे फरफटत जाण्याची गरज नाही. स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊनच उमेदवार ठरविले जातील. यावेळी अॅड. सुरेश कुराडे, अंजनीताई रेडेकर, शंकरराव पाटील, आदी उपस्थित होते.
गणपतरावांना सोबत घ्या!
‘दत्त-शिरोळ’चे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची जयसिंगपूर व कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका आहे. यासाठी त्यांना सोबत घ्यावे, अशी मागणी सदाशिव पोकळकर यांनी केली.
इचलकरंजी काँग्रेसची पाठ
काँग्रेसच्यादृष्टीने इचलकरंजी नगरपालिका महत्त्वाची आहे. शुक्रवारच्या बैठकीला माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना निमंत्रण दिले होते; पण त्यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे यांनीही बैठकीकडे पाठ फिरविली. त्याची चर्चा काँग्रेस कमिटीत सुरू होती.
तडजोड नाही; चिन्हावरच लढा
संपर्कप्रमुखांचे आदेश : शिवसेना नेत्यांची बैठक
कोल्हापूर : नगरपालिका निवडणुकीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार ‘एकला चलो, एकला जितो’ ही भूमिका प्रत्येक कार्यकर्त्याने पाळायची आहे. त्यामुळे कुठेही तडजोड न करता चिन्हावरच लढायचे आहे, असे आदेश शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिले.
जिल्ह्यातील नऊ नगरपालिकाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संपर्कप्रमुख दुधवडकर यांनी शिवसेना नेत्यांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी पक्षशिस्तीनुसारच निवडणुकीला सामोरे जाण्याची सूचना केली. पुढील आठवड्यात नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. स्थानिक पातळीवर कोणतीही तडजोड करायची नाही, पक्षाच्या चिन्हावरच निवडणुकीला सामोरे जायचे असून, त्यादृष्टीने तयारीला लागण्याचे आदेश अरुण दुधवडकर यांनी यावेळी दिले.
ते म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने आतापर्यंत केवळ सत्ता उपभोगली आहे. प्रत्येक सत्तास्थानावर भ्रष्टाचार केला. आगामी निवडणुकांमध्ये त्यांना खाली खेचण्याशिवाय पर्याय नाही.
बैठकीला सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, माजी आमदार संजय घाटगे, चंदगड विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख संग्रामसिंह कुपेकर, प्रा. सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, संभाजी भोकरे, शिवगोंडा पाटील, दिलीप माने, सागर कुराडे, मनोज पवार, सुषमा चव्हाण, विद्या गिरी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)