कोल्हापूर जिल्ह्यातील आठही औद्योगिक संस्थांचे नामकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 12:54 PM2024-10-08T12:54:55+5:302024-10-08T12:57:45+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतला आणि त्याला मंत्रिमंडळाने ...
कोल्हापूर : महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतला आणि त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आठही औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले असून याबाबत नागरिकांकडून नावांबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या.
महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. याबाबत मंत्री लोढा म्हणाले ‘औद्योगिक संस्थांचे नामकरण हा केवळ एक निर्णय नसून, महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या संस्थांना आदर्श नेतृत्वांच्या नावाने ओळख मिळाल्याने या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची शिकवण व प्रेरणा मिळेल.’
नामकरण केलेल्या संस्था :
कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
पन्हाळा - शिवा काशिद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
गडहिंग्लज - सरसेनापती प्रतापराव गुजर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
मुरगूड- सेनापती संताजी घोरपडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
हातकणंगले : वीर धनाजी जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
शाहूवाडी- बाजीप्रभू देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
आजरा- शिवाजी सावंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
भुदरगड - हुतात्मा नारायण वारके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था