नांदणीच्या ‘महादेव’ने साकारले ‘कमांडर’चे स्वप्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:36 AM2020-12-14T04:36:44+5:302020-12-14T04:36:44+5:30
महादेव यांचे प्राथमिक शिक्षण केंद्रीय शाळा, तर माध्यमिक शिक्षण नांदणी हायस्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण जयसिंगपूर येथील जयसिंगपूर कॉलेजमध्ये झाले. ...
महादेव यांचे प्राथमिक शिक्षण केंद्रीय शाळा, तर माध्यमिक शिक्षण नांदणी हायस्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण जयसिंगपूर येथील जयसिंगपूर कॉलेजमध्ये झाले. त्यांनी बी. ए. पदवीचे शिक्षण अ श्रेणीमध्ये पूर्ण केले. २००५-०६ साली त्यांची दिफू आसाम रायफल्स ट्रेनिंग सेंटर स्कूलमध्ये निवड झाली. त्यानंतर नागालँड तुसंग, चसाद मणिपूर, युनायटेड नेशन मिशन हंटी, आसाम लोकरा, टिकनॉपॉल पनिपूर येथे त्यांनी काम केले. गया येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी येथे एक वर्षासाठी त्यांची निवड झाली. त्यांनी खात्यांतर्गत परीक्षा दिली होती. त्यानंतर त्यांची आसाम रायफल्समध्ये असिस्टंट कमांडर या अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. या निवडीमुळे शिरोळ तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. महादेवच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले; तर आई गृहिणी आहे.
टो - १३१२२०२०-जेएवाय-०१-महादेव कुंभार