चंदगडमध्ये नंदिनी बाभूळकर यांचा ‘गाव टू गाव’ संपर्कदौरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:25 AM2019-04-10T00:25:27+5:302019-04-10T00:25:33+5:30
गडहिंग्लज : खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी युवा नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी अक्षरश: आपल्या पायाला भिंगरी बांधली आहे. ...
गडहिंग्लज : खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी युवा नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी अक्षरश: आपल्या पायाला भिंगरी बांधली आहे. १५ दिवसांत तब्बल १३३ गावांचा संपर्क दौरा त्यांनी
पूर्ण केला. मोदी सरकारच्या कामगिरीवर जोरदार हल्लाबोल करीत लोकशाही वाचविण्यासाठी काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीला विजयी करण्याचे आवाहन त्या करीत आहेत.
गेल्या पाच वर्षांत संपूर्णर्
देशात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दलित, अल्पसंख्याक व महिलांवरील वाढते अत्याचार, गगनाला भिडलेली महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी व ‘जीएसटी’मुळे व्यापारी व सर्वसामान्य ग्राहकांची झालेली आर्थिक कोंडी या मुद्द्यांवरच त्यांनी प्रचारात भर दिला आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील शेंद्री येथून त्यांनी या मोहिमेला सुरुवात केली. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील वाड्या-वस्त्यांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह संपर्कदौरा सुरू आहे. दरम्यान, कानडेवाडी, किणे, बसर्गे व पाटणे फाटा येथे त्यांनी प्रचारसभाही घेतल्या. आठवडाभरात दौरा पूर्ण करून जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय मेळावे घेण्याचे नियोजन केल्याचे सांगण्यात आले.
कोण आहेत नंदाताई..?
डॉ. नंदिनी बाभूळकर तथा नंदाताई या विधानसभेचे माजी अध्यक्ष
स्व. बाबासाहेब कुपेकर व विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या
कन्या होत. बाबांच्या आकस्मिक निधनानंतर झालेल्या ‘चंदगड’च्या पोटनिवडणुकीसह सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची सूत्रे त्यांनी
एकहाती सांभाळली. ‘एव्हीएच’ कंपनीच्या विरोधातील यशस्वी लढ्यामुळे त्यांचे नाव देशभर पोहोचले आहे.