नारायण राणे यांचा निर्णय दसºयाला : चंद्रकांतदादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 06:13 PM2017-09-27T18:13:47+5:302017-09-27T18:19:39+5:30

निर्णय घेण्यात अचूक असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे आपल्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात दसºया दिवशी निर्णय घेतील, असे मत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही असा विश्वास व्यक्त करत सत्तेत राहायचे आणि विरोधही करायचा अशा दोन्ही भूमिका शिवसेनेला लोकशाहीत घेता येणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Narayan Rane's decision is ten degrees: Chandrakant Dada | नारायण राणे यांचा निर्णय दसºयाला : चंद्रकांतदादा

नारायण राणे यांचा निर्णय दसºयाला : चंद्रकांतदादा

Next
ठळक मुद्देशिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाहीदोन्ही भूमिका लोकशाहीत घेता येणार नाहीत : चंद्रकांतदादाचा टोला शहा यांची राणे यांनी दिल्लीत घेतलेली भेट मेडीकल कॉलेज संदर्भात भाजपाला जे काही सांगायचे आहे ते शहा यांनी राणे यांना सांगितलेगैरसमजातील असतील ते चर्चेतून दूर होतील

कोल्हापूर, दि. २७ : निर्णय घेण्यात अचूक असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे आपल्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात दसºया दिवशी निर्णय घेतील, असे मत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही असा विश्वास व्यक्त करत सत्तेत राहायचे आणि विरोधही करायचा अशा दोन्ही भूमिका शिवसेनेला लोकशाहीत घेता येणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

महसूल मंत्री पाटील म्हणाले, भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांची माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिल्लीत घेतलेली भेट ही त्यांच्या सिंधुदुर्ग येथील मेडीकल कॉलेज संदर्भात होती. साहजिकच दोन राजकीय व्यक्ती एकत्र आल्यानंतर राजकीय चर्चा होणारच. त्यानुसार झालेल्या राजकीय चर्चेतून एकंदरीत राजकीय बेरीज व वजाबाकीवर भाजप व त्यांच्याकडून असा दोन्ही बाजूंनी विचार झाला.

दोन्ही बाजूंकडून चर्चा झाली असली तरी भाजपाला जे काही सांगायचे आहे ते अमित शहा यांच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री राणे यांना यावेळी सांगण्यात आले. यानंतर पुढील जो काही राजकीय निर्णय घ्यायचा आहे. तो त्यांच्यावरच सोपविला आहे. राणे हे निर्णय घेण्यात अचूक असून ते दसºया दिवशी योग्य निर्णय घेतील.

ते पुढे म्हणाले, शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. त्यांची मानसिकता बाहेर पडण्याची दिसत नाही, असे आम्हाला वाटत नाही. रक्काची माणसे सुध्दा एकमेकांशी भांडतात परंतु त्यांचे भांडण हे रस्त्यावर येत नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेच्या मंत्री व आमदारांसाठी नेहमीच उपलब्ध आहेत. त्यांचे काय विषय असतील ते त्यांनी घेऊन मुख्यमत्र्यांकडे जावे. जे विषय गैरसमजातील असतील ते चर्चेतून दूर होतील व काही तर्कसुसंगत असतील ते मुख्यमंत्री मान्य करुन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील.

परिवहन मंत्री दिवाकर रावते हे शेतकºयांचा विचार करतात. त्यानुसार त्यांनी कर्जमाफी होईल त्यावेळी शेतकºयांना १० हजार रुपये द्यावेत असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. ते मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मान्य केले. हे बॅँकींग नियमावलीच्या विरोधात होते. परंतु ही सुचना तर्कसुसंगत असल्याने मुख्यमंत्री स्वत: याबाबत रिझर्व्ह बॅँकेच्या डेप्युटी गव्हर्नरना दोनवेळा भेटले व याबाबत राज्य सरकार बॅँक गॅरंटी घेईल असे सांगितले.

Web Title: Narayan Rane's decision is ten degrees: Chandrakant Dada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.