‘नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽ’

By Admin | Published: May 5, 2016 12:14 AM2016-05-05T00:14:03+5:302016-05-05T00:23:55+5:30

खरसुंडी यात्रेत गुलाल-खोबऱ्याची मुक्त उधळण आज रथोत्सव : सासनकाठ्या, पालखी सोहळा उत्साहात

'Nathababa's Name Is Good' | ‘नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽ’

‘नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽ’

googlenewsNext

खरसुंडी : महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यांतील अनेक घराण्यांचे कुलदैवत असलेल्या खरसुंडी (ता. आटपाडी) येथील सिध्दनाथाच्या चैत्री यात्रेत बुधवारी पालखी आणि सासनकाठ्यांचा सोहळा उदंड उत्साहात पार पडला. यावेळी गुलाल-खोबऱ्यांची मुक्त उधळण करण्यात आली. दिवसभर रणरणत्या उन्हात ‘नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या जयघोषात भाविकांनी श्रींचे भक्तीभावाने दर्शन घेतले.
श्री सिध्दनाथाची चैत्री यात्रेतील बुधवारी मुख्य दिवस होता. नाथनगरीतील सासनकाठ्यांच्या सोहळ्यास लाखो भाविकांनी हजेरी लावली. सकाळी मंदिर परिसरात विविध गावच्या मानाच्या सासनकाठ्या पारंपारिक वाद्यांच्या तालावर नाचत दाखल झाल्या. दुपारी आटपाडीचे मानकरी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याहस्ते पूजन करून श्रींची पालखी आणि सासनकाठ्यांचे मुख्य बाजारपेठेतून जोगेश्वरी मंदिराकडे प्रस्थान झाले. पालखी व सासनकाठ्यांवर भाविकांनी गुलाल-खोबऱ्याची उधळण करून नवस फेडले.
अग्रभागी धूप आरती, भालदार-चोपदार, छत्रसेवेकरी मानकरी, ‘श्रीं’ची सजवलेली उत्सवमूर्ती, पालखी असा शाही लवाजमा मंदिरातून बाहेर येताच भाविकांकडून गुलाल-खोबऱ्याची पुन्हा अखंड उधळण झाली. पालखी मुख्य बाजारपेठेतून जोगेश्वरी मंदिराकडे आली. सर्व सासनकाठ्या पालखीला भेटवून मानवंदना देण्यात आली. जोगेश्वरी मंदिरात पानसुपारी व मानपानाचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखी पुन्हा श्रीनाथ मंदिराकडे आली.
यंदा खरसुंडीत गुलाल-खोबऱ्याची मोठ्याप्रमाणात आवक झाली. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी देवस्थान समिती, ग्रामपंचायत, महसूल प्रशासन, पोलिसांनी प्रयत्न केले. गुरुवारी रथोत्सव सोहळा पार पडणार आहे.
यंदा कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, देवस्थान समिती यांच्याकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यात्रेत
वाहतूक व्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले.
(वार्ताहर)

Web Title: 'Nathababa's Name Is Good'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.