कोल्हापुरात रविवारी राष्ट्रीय शिक्षण परिषद

By admin | Published: November 6, 2014 12:29 AM2014-11-06T00:29:15+5:302014-11-06T00:39:23+5:30

उद्घाटन गोव्याचे कामगारमंत्री आवेर्तान फुर्तादो व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते

National Education Council in Kolhapur on Sunday | कोल्हापुरात रविवारी राष्ट्रीय शिक्षण परिषद

कोल्हापुरात रविवारी राष्ट्रीय शिक्षण परिषद

Next

कोल्हापूर : गोव्यातील शिक्षक विकास परिषद, ज्ञानदीप मंडळ व शिक्षक विकास प्रतिष्ठान आणि गोवा राज्य कला व संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने २० वी राष्ट्रीय शिक्षण परिषद कोल्हापुरात आयोजित केली आहे. परिषदेचे उद्घाटन रविवारी (दि. ९) सकाळी साडेनऊ वाजता राजारामपुरीतील संयुक्त महाराष्ट्र सोसायटीच्या सभागृहात गोव्याचे कामगारमंत्री आवेर्तान फुर्तादो व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते होणार आहे.
‘शिक्षणासमोरची बदलती आव्हाने व त्यावरील उपाययोजना’ या विषयावर परिषदेत व्यापक चर्चा होणार आहे, अशी माहिती शिक्षक विकास परिषदेचे अध्यक्ष आर. व्ही. कुलकर्णी यांनी दिली. परिषदेला राज्याचे निवृत्त शिक्षण उपसंचालक अरविंद दीक्षित, जिल्हा स्वयंरोजगार केंद्राच्या सहसंचालिका साधना पोटे, केंद्रीय कार्यालयीन भाषा विभागाचे प्रा. डॉ. जयशंकर यादव, गोव्याचे आरोग्य व्यवस्थापक सूरज नाईक, किशोर श्रीवास्तव, प्रा. डॉ. ललिता जोगड, अखिला पठाण, डॉ. विजयकुमार शहा, आदी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: National Education Council in Kolhapur on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.