बारा वर्षांपासून जीव धोक्यात घालुन शिक्षणासाठी दररोज आलोंडतात राष्ट्रीय महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:32 AM2018-11-22T11:32:37+5:302018-11-22T11:39:41+5:30
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली मधील १०४४ विद्यार्थी गेल्या बारा वर्षांपासून जिव धोक्यात घालुन शिक्षणासाठी दररोज आलोंडतात राष्ट्रीय महामार्ग.पुणे बंगळूर महामार्ग क्रमांक चार हा शिरोली
सतीश पाटील -
कोल्हापूर-शिरोली - प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली मधील १०४४ विद्यार्थी गेल्या बारा वर्षांपासून जिव धोक्यात घालुन शिक्षणासाठी दररोज आलोंडतात राष्ट्रीय महामार्ग.पुणे बंगळूर महामार्ग क्रमांक चार हा शिरोली गावातून गेल्यामुळे पूर्व आणि पश्चिम असे गावाचे विभाजन झाले आहे. महामार्गाच्या पूर्वेकडील बाजूला यादववाडी, शिवाजीनगर, व्यंकटेशनगर,चौगुले मळा, मेननकाॅलनी आदी सुमारे दहा हजारहुन अधिक लोकसंख्या असलेला परिसर आहे. तर पश्चिम बाजूला प्राथमिक आणि माध्यमिक अशा एकूण १७ शाळा आहेत.
सन २००२ पूर्वी महामार्ग दुपदरी होता. २००३ ला चौपदरीकरणाला मंजूरी मिळाल्याने चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. यामुळे रस्याची रूंदी आणि उंची वाढली. हे चौपदरीकरणाचे काम करत असताना शाळेला जाण्यासाठी मुलांना भुयारीमार्गाचे नियोजनच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले नाही. शिरोली ग्रामपंचायतीच्यावतीने वारंवार पत्रव्यवहार करून शाळेच्या मुलांना महामार्गावरील वाहतूकीपासुन धोका आहे . यावेळी सदर ठिकाणी भुयारीमार्ग अथवा पादचारी लोखंडी उड्डाणपूल उभा करावे अशी मागणी केली होती. पण आता चौपदरीकरणाच्या कामात बदल होवू शकत नाही. सहापदरीकरणावेळी करू असे त्यावेळी महामंडळाच्या अधिकार्यांनी सांगितले. पण सहापदरीकरणाच्या कामांचा ही अंदाजपत्रक तयार झाला असुन त्यात देखील शिरोली येथे भुयारीमार्गाचा उल्लेख नाही. आज पर्यंत कोणी दखलच घेतली नाही.
सन २००६ मध्ये पुणे बंगळूर महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले. आणि महामार्ग वाहतूकीस खूला झाला. आज महामार्ग पूर्ण होवून बारा वर्षे झाली पण ही मुलं गेली बारा वर्षे शिक्षणासाठी जिव धोक्यात घालुन महामार्ग ओलांडत आहेत. या शिरोलीवरून जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदार, शिक्षण अधिकारी प्रवास करतात पण त्यांच्या निदर्शनास ही बाब आली नसेल का.
अजुन किती दिवस हे विद्यार्थी जिव धोक्यात घालुन महामार्ग ओलांडून प्रवास करणार.
1)महामार्गावरील वाहने भरधाव वेगाने धावतात. सेवामार्ग, महामार्ग आणि पुन्हा सेवामार्ग ओलांडताना विद्यार्थ्यांच्या काळजाचा ठोका वाढलेला असतो. लांब असलेली वाहने बघता बघता जवळ येतात. रस्ता पूर्ण मोकळा झाला की मगच प्रवास करावा लागतो.
2)शिरोली मधील १०४४ विद्यार्थी शिक्षणासाठी जिव धोक्यात घालुन दररोज महामार्ग ओलांडतात. विद्यार्थ्याच्यासाठी भुयारीमार्ग मंजुर करून घेणे गरजेचे आहे.पण याकडे कोणत्या ही लोकप्रतिनीधीचे लक्ष नाही. लोकप्रतिनीधीनी याठिकाणी भुयारीमार्ग होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.