क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमाची देश पातळीवर दखल : गणपतराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:23 AM2021-04-07T04:23:40+5:302021-04-07T04:23:40+5:30

शिरोळ : क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमाची देश पातळीवर दखल घेतली जात आहे. अनेक जण या प्रकल्पाला भेटी देऊन कौतुक ...

National level attention to saline land improvement program: Ganapatrao Patil | क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमाची देश पातळीवर दखल : गणपतराव पाटील

क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमाची देश पातळीवर दखल : गणपतराव पाटील

Next

शिरोळ : क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमाची देश पातळीवर दखल घेतली जात आहे. अनेक जण या प्रकल्पाला भेटी देऊन कौतुक करीत आहेत. त्यामुळे नापीक जमीन सुधारण्याची दृष्टी शेतकऱ्यांत निर्माण होण्याची गरज आहे. नापीक जमीन सुधारली तर यातून आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी लागेल ती मदत करू, असे आश्वासन श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिले. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी शिरोळ परिसरातील क्षारपड जमीन सुधारण्याचा प्रकल्प पूर्ण करावा, असेही त्यांनी आवाहन केले.

येथील श्री बुवाफन महाराज क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प संस्थेकडून ५५० एकर जमीन सुधारण्याच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा प्रारंभ अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानावरून नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले, शिरोळमधील शेतकऱ्यांनी नापीक जमिनी सुधारण्यासाठी उशिरा का होईना संघटितपणा दाखविला आहे. शिरोळ भागातील जमिनी सुधारत असताना अडचणी आल्या तर त्यातून मार्ग काढला जाईल. त्याशिवाय या कामामध्ये नगरपरिषदेचे सहकार्य राहील. यावेळी रावसाहेब देसाई, चंद्रशेखर दांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, श्रीशैल हेगान्ना, प्रा. मोहन पाटील, गोरखनाथ माने, संजय कोळी, नामदेव मोरे, लियाकत सनदी, हरी कोरे, बाबा पाटील, धनाजी पाटील, आण्णासाहेब चौगुले, संजय चव्हाण, किरण पाटील, बबन बन्ने, कीर्तीवर्धन मरजे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. नगरसेवक तातोबा पाटील यांनी स्वागत केले तर दरगू गावडे यांनी आभार मानले.

फोटो - ०६०४२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - शिरोळ येथे क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमाचे उद्घाटन दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी रावसाहेब देसाई, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, तातोबा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: National level attention to saline land improvement program: Ganapatrao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.