राष्ट्रीय रस्सीखेच प्रशिक्षणास प्रारंभ

By admin | Published: June 6, 2015 12:59 AM2015-06-06T00:59:20+5:302015-06-06T01:03:42+5:30

खेळात निष्पक्षपातीपणे निर्णय दिल्यास कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही.

National Rashikachicha training begins | राष्ट्रीय रस्सीखेच प्रशिक्षणास प्रारंभ

राष्ट्रीय रस्सीखेच प्रशिक्षणास प्रारंभ

Next

कोल्हापूर : स्पर्धेदरम्यान पंचांनी निष्पक्षपाती भूमिका पार पाडावी, जेणेकरून खेळाडूंना न्याय मिळेल, असे प्रतिपादन ‘भारत श्री’ व शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभीषण पाटील यांनी केले. अखिल भारतीय टग-आॅफ वॉर (रस्सीखेच) असोसिएशनच्यावतीने पन्हाळ्याजवळील वाघबीळ येथे शुक्रवारी पंच प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, खेळ कोणताही असो त्यात पंचांची भूमिका ही न्यायाधीशाची असते. त्यामुळे खेळात निष्पक्षपातीपणे निर्णय दिल्यास कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही. या शिबिरांतून पंचांना तंत्रशुद्ध खेळांचे प्रशिक्षण मिळणार आहे.
यावेळी राष्ट्रीय टंग-आॅफ वॉर असोसिएशनच्या महासचिव माधवी पाटील म्हणाल्या, जो प्रशिक्षक पंच तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतो, तो कधीही खेळाडूंवर अन्याय करत नाही. त्यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षणाची गरज विशद केली. असोसिएशनचे तांत्रिक कमिटीचे अध्यक्ष मदन मोहन यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी असोसिएशनचे खजिनदार जे. ई. गुपिते, प्रा. गौरव दीक्षित आदी उपस्थित होते.

Web Title: National Rashikachicha training begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.