स्वेनिल शहा यांच्या शोधनिबंधाची राष्ट्रीय पातळीवर दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:23 AM2021-05-01T04:23:01+5:302021-05-01T04:23:01+5:30
कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालयातील क्ष-किरण विभाग प्रमुख डॉ. स्वेनिल अरुण शहा यांनी गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्हा व ...
कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालयातील क्ष-किरण विभाग प्रमुख डॉ. स्वेनिल अरुण शहा यांनी गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्याबाहेरील कोरोना रुग्णांचे रुग्णालयात झालेल्या एचआरसीटी सीटी स्कॅॅनबाबत संशोधन केले. त्याबाबतचा त्यांचा २३ पानी शोधनिबंध ‘इंडियन जर्नल ऑफ रेडिओलॉजी अँड इमेजिन’ (आयजेआरआय) या राष्ट्रीय त्रैमासिक नियतकालिकामध्ये प्रसिध्द झाला आहे. या शोधनिबंधामधील आलेख हे आगामी काळामध्ये कोरोना रुग्णांचे एचआरसीटी अहवाल देण्यास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील रेडिओलॉजिस्टसाठी उपयोगी ठरणार असल्याची माहिती डॉ. शहा यांनी दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील क्ष-किरणशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापकपदी डॉ. शहा कार्यरत आहेत. त्यांनी या शोधनिबंधामध्ये कोविड रुग्णाच्या फुफ्फुसामध्ये न्यूमोनिया कसा ओळखावा, त्याचे प्रमाण कसे मापावे. स्कोरिंग सिस्टिम कशी असावी, छातीच्या एक्सरेपेक्षा सीटी स्कॅॅनचा काय फायदा आहे. हे स्कॅॅन केल्यामुळे रुग्णांवर उपचार पध्दती कशाप्रकारे ठरू शकेल यांचे स्पष्टीकरण केले आहे. गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोविड रुग्णांचे सीटी स्कॅन या विभागामध्ये अखंडितपणे सुरू आहे. या विभागात दहा हजार कोविड रुग्णांचे सीटी स्कॅॅन झाले असल्याची माहिती डॉ. शहा यांनी दिली. त्यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, माजी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांचे मार्गदर्शन, तर डॉ. मनजित कुलकर्णी, उल्हास मिसाळ, अनिता सैब्बनावार आदींचे सहकार्य लाभले.
फोटो (३००४२०२१-कोल-स्वेनिल शहा (मेडिकल कॉलेज)
===Photopath===
300421\30kol_5_30042021_5.jpg
===Caption===
फोटो (३००४२०२१-कोल-स्वेनिल शहा (मेडिकल कॉलेज)